व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prakash Ambedkar : संकटाच्या काळात मोदी मौन बाळगतात, परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात,...

Prakash Ambedkar : संकटाच्या काळात मोदी मौन बाळगतात, परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात, प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar criticises Prime Minister Modi, saying he remains silent during times of crisis and stays occupied with foreign tours : अमेरिकेसमोर नतमस्तक होऊन देशाला पुन्हा गुलाम बनवत असल्याचा आरोप

Akola वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील (X) एका पोस्टद्वारे त्यांनी अमेरिकेतील घटनांच्या संदर्भात भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या तीन नागरिकांच्या मृत्यूबाबत अमेरिकेकडे जाब विचारला असता, संबंधित घटनेबाबत अमेरिकेला जबाबदार धरले असते आणि आवश्यक ती कठोर पावले उचलली असती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Us Iran peace deal : अमेरिका-इराण शांतता कराराची मोठी घोषणा; कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

मोदी यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, संकटाच्या काळात ते मौन बाळगतात, तर परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात. तसेच अमेरिकेबाबत भारत सरकारची भूमिका अत्यंत लाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. त्यांच्या धोरणांमुळे भारत पुन्हा एकदा गुलाम देश बनत आहे,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचाही वापर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!