व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Farmers loan waiver : कर्जमाफीच्या यादीत तफावत; हजारो पात्र शेतकरी वंचित असल्याचा...

Farmers loan waiver : कर्जमाफीच्या यादीत तफावत; हजारो पात्र शेतकरी वंचित असल्याचा आरोप

Discrepancies found in the farm loan waiver list; thousands of eligible farmers in Teosa taluka allegedly left out : शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेची चुकीची नोंद झाल्याचा दावा

Amravati राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप करत तिवसा तालुक्यातील हजारो पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच यादीत समाविष्ट असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेची चुकीची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून कर्जमाफीबाबत केवळ तोंडी घोषणा केल्या जात असून, त्याऐवजी अधिकृत शासन निर्णय किंवा लेखी आदेश तातडीने जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Vanchit Bahujan Aghadi election : अर्ध्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अकोल्याचा कौल राजेंद्र पातोडेंकडे

शेतकऱ्यांनी काही उदाहरणेही मांडली आहेत. वहा येथील विनायक शामराव ठाकरे यांच्याकडे ५२ आर शेती असून त्यांच्यावर ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. ते पात्र असूनही त्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. शेंदोळा बुद्रुक येथील भारत पुंडलिकराव धसकट यांच्यावर २ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज असताना केवळ १ लाख ८ हजार रुपयांचीच कर्जमाफी दाखविण्यात आल्याचे सांगण्यात आले. माणिकग्राम धोत्रा येथील विवेक ठाकरे, शिरजगाव मोझरी येथील उत्तम येरणे आणि शिरजगाव येथील देवेंद्र तायवाडे यांच्या कर्जमाफीच्या रकमेतही तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Ajit doval : स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे

निवेदनाद्वारे कर्जमाफीच्या यादीतील चुकीची आकडेवारी तातडीने दुरुस्त करावी, वंचित पात्र शेतकऱ्यांचा समावेश करून सुधारित यादी जाहीर करावी आणि कर्जमाफीबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या त्रुटी दूर होईपर्यंत शेतकरी ई-केवायसी करणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह संदीप हगवणे, प्रकाश चिचखेडे, भास्कर कुरळकर, स्वप्नील निस्ताने, विवेक ठाकरे, भूषण गाठे, पुरुषोत्तम मेश्राम, हर्षल मेश्राम, सुरेश ठाकरे, शेखर वानखडे, पंडित सहारे, संजय ठाकरे, सुभाष नागपुरे, श्याम बेले, गिरीधर राठोड, अंकुश डफळ, गजानन अंबुलकर, गोपाळ चौधरी, भारत धसकट आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!