व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Lonar protest : महापुरुषांच्या स्मारकाच्या जागेसाठी सरणावर अर्धनग्न आंदोलन; प्रशासनाविरोधात संताप

Lonar protest : महापुरुषांच्या स्मारकाच्या जागेसाठी सरणावर अर्धनग्न आंदोलन; प्रशासनाविरोधात संताप

Half-naked protest at a funeral pyre site demanding land for a memorial of great leaders; anger mounts against the administration : अतिक्रमण हटवून जागा समाजाच्या ताब्यात द्या; लोणार पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

Lonar तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील क्रांतिवीर वस्ताद वीर लहुजी साळवे आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रस्तावित स्मारक व सभामंडपासाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा मातंग समाजाच्या ताब्यात द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अनिलकुमार कांबळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सरण रचून अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात कांबळे यांनी यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत नियोजित जागेचे तार कुंपण तोडून करण्यात आलेले अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली होती. तसेच मागणीची दखल न घेतल्यास २२ जूनपासून पंचायत समिती कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.

मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत कांबळे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून पंचायत समितीसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले. भर उन्हात लाकडाचे सरण रचून त्यावर बसत त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

e-Crop Inspection : ई-पीक पाहणीत मोठा बदल; शेतकऱ्यांऐवजी सहायक करणार पीक नोंदणी

कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, पिंपळनेर येथील संबंधित जागा गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पारंपरिक व्यवसायासाठी वापरली जात होती. काळाच्या ओघात तो व्यवसाय बंद झाल्यानंतर समाजबांधवांनी ती जागा क्रांतिवीर वस्ताद वीर लहुजी साळवे आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सभामंडपासाठी राखीव ठेवली. या जागेतील काही भाग कैलास सोसायटीला देण्यात आला होता.

तथापि, नियोजित जागेचे तार कुंपण तोडून काही व्यक्तींनी ग्रामसेवकांच्या मदतीने अतिक्रमण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी निवेदनात केला आहे.

International Yoga Day : योगासनांपेक्षा ‘मखमली हिरवळ’ची चर्चा; शिंदेंच्या पोस्टने रंगले राजकारण

अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच महापुरुषांच्या स्मारकासाठी राखीव जागा समाजाच्या ताब्यात द्यावी, या मागणीवर ते ठाम असून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!