व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal Corporation : ओपन स्पेस प्रकरणावर महापालिका सभागृहात खडाजंगी; १०० कोटींच्या...

Akola Municipal Corporation : ओपन स्पेस प्रकरणावर महापालिका सभागृहात खडाजंगी; १०० कोटींच्या शोरूमपासून एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Opposition alleges that the Municipal Corporation administration has deliberately neglected issues related to the city’s open spaces : महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा विरोधकांचा आरोप

Akola महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी ओपन स्पेसच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक सागर भारुका यांनी शहरातील ओपन स्पेसवर सुमारे १०० कोटी रुपयांचे शोरूम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, शहरभरातील ओपन स्पेस प्रकरणात तब्बल १,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला. त्यांच्या आरोपांमुळे सभागृहात मोठी खळबळ उडाली.

सागर भारुका यांनी शहरातील विविध भागांतील ओपन स्पेसचा नियमबाह्य वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही ठिकाणी गोठ्यांच्या परिसरात व्यावसायिक बांधकामे उभी राहत असताना महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ओपन स्पेसच्या वापरासंदर्भात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही सभागृहात केली. मात्र, या आरोपांना महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ठामपणे फेटाळून लावले.

Operation Lotus : विदर्भात ‘ऑपरेशन कमळ’? उद्धव ठाकरे आपल्या टीमसोबत शुक्रवारी विदर्भात

नगरसेवकांकडून करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित विषयावर ठोस पुरावे आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर आल्यास प्रशासन योग्य ती भूमिका घेईल; मात्र केवळ आरोपांच्या आधारे प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५१ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी या स्मारकाची आवश्यकता अधोरेखित करत शहराच्या वैभवात भर घालणारा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली.

विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन, सभापती विजय अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम, रफिक सिद्दीकी, पराग गवई आणि नीलेश देव यांनीही या विषयावर आपली मते मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली.

Birth date wedding cards : लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य करण्याची तयारी

ओपन स्पेस प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे महानगरपालिकेचे सभागृह चांगलेच गाजले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

error: Content is protected !!