व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : भाजप आणि महायुतीत भांडणे लावू नका, आधी स्वतःचे घर...

Chandrashekhar bawankule : भाजप आणि महायुतीत भांडणे लावू नका, आधी स्वतःचे घर सांभाळा; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

Chandrashekhar Bawankule advises Uddhav Thackeray to focus on managing his own party instead of trying to create rifts within the Mahayuti alliance : उद्धव यांनी मोदी, शाह यांच्यावर केलेल्या आरोपांना दिले उत्तर

Nagpur उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याची फार चिंता करू नये, आधी आपला उरलेला पक्ष सांभाळावा. चाळीस आमदार आणि सहा खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ का केला, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शेलक्या शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना नागपुरात सडेतोड प्रत्युत्तर दिले. भाजप आणि महायुतीमध्ये वितुष्ट आणण्याचा ठाकरेंचा हेतू कधीही यशस्वी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. शिर्डी येथील सभेत बोलताना ठाकरेंनी, देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान होऊ नयेत म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडली, असा खळबळजनक आरोप केला होता. ठाकरेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असतानाच, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंचा हा डाव अचूक ओळखत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.

Vishwas nangre patil : होय, संघाच्या कार्यक्रमाला गेलो, त्यात नियमबाह्य काय?; नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भूमिका केली स्पष्ट

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रगल्भ आणि अष्टपैलू नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असून त्यांचे राजकीय भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. त्यांच्या आड कोणी आले तरी काही फरक पडत नाही. फडणवीस हे २०३४ पर्यंत महाराष्ट्राला हवे आहेत.

उद्धव ठाकरेंच्या केवळ खळबळ उडवून देण्याच्या राजकारणावर घणाघाती टीका करताना बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना आता भाजप आणि महायुतीत भांडणे लावण्यापलीकडे काहीही काम उरलेले नाही. त्यांनी आधी आपले घर सांभाळावे. त्यांचे लोक त्यांना सोडून का जात आहेत यावर विचार करावा. आधी चाळीस आमदार गेले, आता सहा खासदारांनी साथ सोडली; त्यामुळे आता जे काही मोजके लोक पक्षात उरले आहेत, ते तरी पक्षात कसे राहतील याकडे ठाकरेंनी लक्ष द्यावे. बावनकुळे यांच्या या धारदार वक्तव्यामुळे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमधील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगात येण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!