व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vishwas nangre patil : होय, संघाच्या कार्यक्रमाला गेलो, त्यात नियमबाह्य काय?; नवनियुक्त...

Vishwas nangre patil : होय, संघाच्या कार्यक्रमाला गेलो, त्यात नियमबाह्य काय?; नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भूमिका केली स्पष्ट

What is wrong about attending an RSS event?; Vishwas Nangare Patil clarifies his stand : संघाच्या कार्यक्रमात नियमाला धरून व कायद्याच्या चौकटीत बोलल्याचा दावा

Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय वाद ओढावून घेणारे विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यांनी पदभार स्वीकारताच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आणि मी संघाच्या कार्यक्रमात जे काही बोललो ते नियमाला व कायद्याच्या चौकटीत बसूनच बोललो असा दावा त्यांनी केला.

विश्वास नांगरे पाटील यांची एक धडाकेबाज पोलिस आयुक्त म्हणून ओळख आहे. अनेक रायप्रोफाईल रेव्ह पार्ट्यांवर त्यांनी धाडी टाकून खळबळ उडवून दिली होती. अलीकडे नागपूरमध्ये ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वच स्तरातून यावर चिंता व्यक्त होते आहे. आतापर्यंत विविध राज्यातून आलेले ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असल्याने छोट्या छोट्या घटनांचीही चर्चा होत असते.

विरोधक नागपूरमधील घडामोडींवर लक्षच ठेवून असतात. हे बघूनच मुख्यमंत्री यांचे शहर आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पोलिस आयुक्त म्हणून नांगरे पाटील यांना आणले असल्याचे बोलले जात आहे. ड्रग्स माफियांची साखळी मोडून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. मात्र नागपूरमध्ये रुजू होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली याचीच चर्चा अधिक रंगली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला होता. अधिकाऱ्यांनी कुठल्या कार्यक्रमाला जावे आणि सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे याचे भान ठेवावे असे सांगून नांगरे पाटल्यांना संघ एवढाच प्रिय असेल त्यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा आणि भाजपात प्रवेश घ्यावा असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले होते.

Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांना न्याय, दुग्ध व्यवसायाला बळ आणि आरोग्य सुविधांचा विस्तार; मुनगंटीवारांनी त्रिसूत्रीच सांगितली

दुसरीकडे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी आपल्याल अर्बन नक्षल ठरवून पोलिस आयुक्त एनकाऊंटर करतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे नांगरे पाटील यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सोमवारी त्यांनी अधिकृतपणे पोलिस आयुक्त पदाचा अधिकृत पदाभार स्वीकारला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले, मी फक्त संघाच्याच नव्हे तर यापूर्वी विविध धर्मीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या माध्यमातून त्यांचे म्हणने ऐकूण घेतले आहे. नागपूरमध्ये येण्यापूर्वी यावर कोणी आक्षेप घेतला नाही. फक्त संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी केला. मी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याने कोण काय म्हणाले, कोणी काय आकलन केले हे मला ठावून नाही. त्याच्या खोलातही मला जायचे नाही. मात्र मी जे काही केले ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केले असा दावाही विश्वास नांगरे पाटील यांनी केला.

विशेष म्हणजे संघाच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी व कर्माचाऱ्यांनी जाऊ नये यावरची बंद केंद्र सरकारने यापूर्वीच हटविली नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यांनी पदभार स्वीकारताच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आणि मी संघाच्या कार्यक्रमात जे काही बोललो, ते नियमाला व कायद्याच्या चौकटीत बसूनच बोललो, असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला. विश्वास नांगरे पाटील यांची एक धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे. यापूर्वी अनेक हायप्रोफाईल रेव्ह पार्ट्यांवर धाडी टाकून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

TET paper leak: टीईटी पेपरफुटी प्रकरण : प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातच छापा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठाम मागणी

अलीकडच्या काळात नागपूरमध्ये ड्रग्जचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला असून, सर्वच स्तरातून यावर चिंता व्यक्त होत आहे. आतापर्यंत विविध राज्यांतून नागपुरात आलेला मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असल्याने नागपूरमधील छोट्या-छोट्या घटनांचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत असते; तसेच विरोधकही नागपूरमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतात. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांचे शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा नांगरे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील ड्रग्ज म…

error: Content is protected !!