Roads in Balapur are in a poor condition; 851 accidents and 334 deaths in 7 years : ठाकरेंच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे १५० कोटींच्या विशेष निधीची मागणी
Akola बाळापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. २०१९ ते जून २०२६ या कालावधीत मतदारसंघात तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले असून, त्यामध्ये ३३४ नागरिकांचा मृत्यू, तर ११० जण गंभीर जखमी किंवा कायमस्वरूपी अपंग झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि नूतनीकरणासाठी किमान १५० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि दीर्घकाळापासून रखडलेली देखभाल यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.
Heavy rain alert : महाराष्ट्रावर पावसाचा प्रहार! अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट
आमदार देशमुख यांनी बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून रस्ते अपघातांची माहिती मागविली असता ही चिंताजनक आकडेवारी समोर आली. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक नागरिक मणक्याचे विकार, सांधेदुखी आणि इतर शारीरिक समस्यांनी त्रस्त असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
Tukaram mundhe : तुकाराम मुंढेंची राज्यातील सर्वात मोठी धडक कारवाई!
रस्ते अपघातांची आकडेवारी
– बाळापूर पोलीस ठाणे : ४७८ अपघात, १५३ मृत्यू
– पातूर पोलीस ठाणे : १६८ अपघात, ९२ मृत्यू
– उरळ पोलीस ठाणे : ९८ अपघात, ३७ मृत्यू
– चांनी पोलीस ठाणे : ४० अपघात, १८ मृत्यू
– अकोट फैल पोलीस ठाणे : ६७ अपघात, ३४ मृत्यू
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागांना रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.








