Nagpur congress protest against government on Ayodhya donation theft issue: पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर भजन करून भाजपच्या घोटाळ्यावर केला प्रहार
Nagpur अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले असून, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राममंदिर निर्मितीसाठी आघाडीवर असणारेच या कथित घोटाळ्यात सामील असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
विरोधकांनी या मुद्द्यावरून देशपातळीवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनानंतर आता काँग्रेसनेही भाजपविरोधात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह पुकारला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचा पांढरा कुर्ता, टोक्यावर टोपी, हातात टाळ घेऊन सेंट्रल एव्हेन्यूवरील पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर श्रीरामाची भजने गाऊन भाजप व त्यांच्या नेत्यांना सबको संमती दो भगवान….अशी आवळणी करण्यात आली. या आंदोलनात शकडो कार्यकर्ते सरभाही झाले होते.
विरोधात असताना अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी भाजपने देशव्यापी आंदोलन छेडले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या रथयात्रेने देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते आणि हेच आंदोलन भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले.
Nitin Raut : बोलू न दिल्याने नितीन राऊत संतापले; महानिर्मितीच्या खाजगीकरणाचा केला आरोप
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येत भव्यदिव्य राममंदिराची निर्मितीही करण्यात आली. मात्र, आता अयोध्येत येणारे दान आणि त्यातील कथित गैरव्यवहार हीच भाजपसमोर सर्वात मोठी अडचण बनली आहे. ज्या मुद्द्याने भाजपला सत्तेचा मार्ग दाखवला, त्याच राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावरून आता विरोधक देशपातळीवर आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे.








