व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bombay High Court : अकोला पश्चिम निवडणुकीची कागदपत्रे सुरक्षित ठेवा, न्यायालयाच्या आदेशांमुळे...

Bombay High Court : अकोला पश्चिम निवडणुकीची कागदपत्रे सुरक्षित ठेवा, न्यायालयाच्या आदेशांमुळे काँग्रेसचे आमदार अडचणीत

Preserve the Akola West election records; court orders put Congress MLA in a difficult spot : भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांचा अर्ज मंजूर; साजिद खान पठाण यांचे तांत्रिक आक्षेप फेटाळले

Akola मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि नोंदी सुरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी दाखल केलेला दिवाणी अर्ज न्यायालयाने मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या न्यायालयात झाली. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अवैध मतदान झाल्याचा आरोप करत अग्रवाल यांनी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवडीविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यात निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता

याचिकेनुसार, ३,६१४ मतदारांनी एकापेक्षा अधिक वेळा मतदान केल्याचा आरोप आहे. तसेच अकोला पश्चिम आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत १,१२५ मतदारांची नावे व छायाचित्रे एकाच वेळी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मतदारांनी दोन्ही मतदारसंघांत मतदान केल्याचे तसेच त्याबाबतचे जबाब संबंधित पोलिस ठाण्यांत नोंदविण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ६२(३) व ६२(४)नुसार अशी मते बेकायदेशीर ठरतात, असा अग्रवाल यांचा दावा आहे. अग्रवाल यांच्यातर्फे ॲड. रोहन मालविया यांनी बाजू मांडली. मतदार यादीवर आक्षेप घेता येत नसल्याने याचिका ग्राह्य धरता येणार नाही, असा तांत्रिक आक्षेप आमदार पठाण यांनी घेतला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावत याचिकाकर्त्याने मतदार यादीवर नव्हे, तर एकाच मतदाराने दोन मतदारसंघांत दोनदा मतदान केल्याच्या कथित प्रकारावर आक्षेप घेतल्याचे स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या आक्षेपावर कायद्यात कोणतीही बंदी नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. अंतिम सुनावणीतील मुद्दे निश्चित करण्यासाठी न्यायालयाने ३१ जुलै ही तारीख निश्चित केली. यावर विजय अग्रवाल म्हणाले, “याचिकेत संबंधित मतदारांची नावानिशी माहिती दिली आहे. बाळापूर, बार्शीटाकळी आणि अकोट येथील मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा मुद्दा मांडला असून, त्यावर न्यायालय निर्णय देईल.”

Ncp crisis : राष्ट्रवादीत अंतर्गत खदखद; संवादाच्या अभावामुळे असंतोष वाढल्याचा दावा

“कोणत्याही निवडणुकीतील कागदपत्रे सुरक्षित ठेवणे ही नियमित प्रक्रिया आहे. न्यायालयाच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करेन,” अशी भूमिका साजिद खान यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!