व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र गडकरींच्या बदनामीचा ‘इथेनॉल’ कट; नागपुरात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, युट्युबर मनीष कश्यपसह...

गडकरींच्या बदनामीचा ‘इथेनॉल’ कट; नागपुरात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, युट्युबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हे दाखल

Cases registered against four individuals, including a YouTuber, for allegedly defaming Nitin Gadkari over ethanol : इथेनॉल संदर्भात खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती पसरविल्याचा आरोप

Nagpur केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर इथेनॉल संदर्भात अत्यंत खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती पसरवून सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे वाहने खराब होत असल्याचा अपप्रचार करत काही सोशल मीडिया अकाऊंट्सवरून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य केले जात होते.

हा प्रकार निदर्शनास येताच भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे संयोजक शिशिर त्रिपाठी, सहसंयोजक संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी आक्रमक भूमिका घेत नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात संयुक्तपणे अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची नागपूर शहर सायबर पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेत बिहारचा प्रसिद्ध युट्युबर मनीष कश्यपसह चार सोशल मीडिया खातेदारांवर गुन्हे दाखल केले असून, या कारवाईमुळे सोशल मीडियावर फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Sudhir mungantiwar : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करा, मुनगंटीवारांचे सरकारला पत्र

तक्रारीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते ११.३० च्या दरम्यान ‘मनीष कश्यप बिहार’ या युट्युब चॅनेलवरून नितीन गडकरी यांच्याविरोधात इथेनॉल संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता, ज्यामध्ये जनसामान्यांची दिशाभूल करणारी खोटी माहिती, बदनामीकारक टिप्पणी आणि अत्यंत आक्षेपार्ह आरोप करण्यात आले होते. केवळ मनीष कश्यपच नाही, तर ‘देसी बॉईज’, ‘हर्षित राठी’ आणि अंकलेश इनवाती या इंस्टाग्राम खातेदारांनीही जाणीवपूर्वक सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ व्हायरल केले होते.

Akola Municipal corporation : निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जी; अकोला मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भाजपने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिसांनी तातडीने गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून व्हीआयपी व्यक्तींची बदनामी करणे किंवा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, तसेच अशा प्रवृत्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.

error: Content is protected !!