व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul Gandhi: सरकारला सर्व बंद करता येते, पण पेपर फूट नाही; राहुल...

Rahul Gandhi: सरकारला सर्व बंद करता येते, पण पेपर फूट नाही; राहुल गांधींचे मोदी सरकारवर बोचरे ट्विट

Rahul Gandhi attacks Modi government on NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी मेट्रो, इंटरनेट सेवा बंद केल्याचा आरोप

New delhi नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी रेल्वे बंद, मेट्रो बंद, इंटरनेट बंद आणि अन्न पुरवठाही बंद; हे सर्व सरकारला उत्तम जमते, पण विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी पेपर फूट मात्र बंद करता येत नाही, अशी झनझणीत टीका राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

सुरुवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता या मुद्द्यावर संपूर्ण आक्रमकता स्वीकारली आहे. संसदेवर धडक मोर्चा काढत असताना आंदोलकांसोबत स्वतः राहुल गांधी सहभागी झाले होते, जिथे पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलनांचा बडगा उगारला आहे. नागपूरमध्ये राजभवनावर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला असून, आज सायंकाळी देशभरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्या उद्धव ठाकरे सेना आणि मनसेच्या वतीने आयोजित आंदोलनामध्येही काँग्रेस सक्रीय सहभाग नोंदवणार आहे.

NEET paper leak: सरसंघचालकांचा मोदी सरकारला घरचा आहेर; नीट आंदोलनावरून कान टोचत सुचवला मोलाचा मार्ग

वाढत्या राजकीय दबावामुळे केंद्र सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणे आणि पेपर फुटीविरोधात १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला कठोर कायदा मंजूर करण्यासारखी पावले उचलली आहेत. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवत चर्चेची एक फेरी पूर्ण केली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक आणि विरोधक अद्यापही ठाम आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि इंटरनेट सेवा खंडित केल्याच्या प्रकारावरून राहुल गांधींनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे.

error: Content is protected !!