Youth Congress stages a ‘Sholay’-style protest against the CET–MPSC paper leak : पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
Akola सीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने शहरात आक्रमक आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाण्याच्या उंच टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या नाट्यमय आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप केला. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
Akola municipal corporation: भूखंड आरक्षण घोटाळ्यावर महापालिका आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात धाव
यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यात अपयशी ठरल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
High court questions : “आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली?”
पाण्याच्या टाकीवर कार्यकर्ते चढल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनानंतर आकाश कवडे यांच्यासह सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.








