व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prashant Kishore: भाजपला मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षांची जागा गमावली; प्रशांत किशोर धडकले...

Prashant Kishore: भाजपला मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षांची जागा गमावली; प्रशांत किशोर धडकले विधानसभेत

Prashant Kishore wins Nitin nabin’s constituency in bankipur by-poll election : भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा केला पराभव; तीन दशके भाजपकडे होता मतदारसंघ

New delhi भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये एक मोठा राजकीय धक्का बसला असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आणि विधानसभेत धमाकेदार एन्ट्री केली. विशेष म्हणजे, १९९५ पासून हा सुरक्षित मतदारसंघ सतत भाजपच्याच ताब्यात होता; परंतु राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन यांना राज्यसभेत पाठवण्यात आल्याने त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे ही पोटनिवडणूक लागली.

बिहारच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नव्हता आणि खुद्द प्रशांत किशोर यांचाही पराभव झाला होता. एक प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांनी यापूर्वी भाजप, तृणमूल काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी स्ट्रटेजी आखून दिली होती, पण स्वतःचा पक्ष काढल्यानंतर त्यांना मिळालेले हे यश लक्षवेधी ठरले असून ते स्वतःच्या पक्षाचे पहिले आमदार ठरले आहेत.

हा पराभव भाजपसाठी एक मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे भाजपला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला होता, ज्यातून देशभरात भाजपच्या विरोधात असलेला रोष समोर आला होता. आता थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या गड मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने आगामी राष्ट्रीय राजकारणावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!