व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Navneet Rana : इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे… नवनीत राणांची...

Navneet Rana : इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे… नवनीत राणांची पोस्ट व्हायरल!

Social post of navneet rana goes viral : माजी खासदाराचा रोख कुणाकडे; अमरावतीच्या राजकारणात चर्चेला उधाण

Amravati अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ‘पुराने पेड़ों का मजाक उड़ा रहे थे नये पौधे… इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे…’ असा आशय असलेल्या या पोस्टकडे राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.

नवनीत राणा यांच्या या पोस्टमध्ये कोणाचेही नाव स्पष्टपणे घेण्यात आलेले नाही. मात्र, अमरावतीच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी आणि अलीकडील राजकीय वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर या पोस्टचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात या पोस्टचीच चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, रवी राणा यांच्या अलीकडील वक्तव्यानंतर नवनीत राणा यांनी ही सूचक पोस्ट केल्याने त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यांच्या पोस्टमधील ‘जुने पेड़’ आणि ‘नये पौधे’ या उल्लेखांचा संबंध अमरावतीतील राजकीय वादाशी जोडला जात आहे. मात्र, नवनीत राणा यांनी स्वतः या पोस्टमधून कोणाला उद्देशून हे वक्तव्य केले आहे, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

AMIM : एमआयएम नगरसेवकाच्या ‘डीएनए टेस्ट’ची मागणी

अमरावतीच्या राजकारणात विविध पक्ष आणि नेत्यांमधील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. आगामी काळातील स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची वक्तव्ये आणि सोशल मीडिया पोस्टकडेही राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या या पोस्टमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Local body elections : निवडणूक रखडली, प्रशासकांना खर्चाचे पूर्ण अधिकार नसल्याने गावगाडा थांबला

दरम्यान, या पोस्टमधून नवनीत राणा यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट कोणत्या राजकीय संदर्भात करण्यात आली, याबाबतचे तर्क-वितर्क पुढील काळातही सुरू राहण्याची शक्यता आहे. नव्या राजकीय समीकरणांची चाहूल देणारी ही पोस्ट आहे की केवळ सूचक राजकीय भाष्य, याकडे आता लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!