व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pavitra portal : शिक्षक आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा

Pavitra portal : शिक्षक आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा

High-level inquiry sought into reservation in teacher and police recruitment : पवित्र पोर्टलसंदर्भात मुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडे वंचित बहुजन आघाडीची तक्रार

Akola महाराष्ट्रातील पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसह पोलीस भरतीमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गांच्या आरक्षणाची पदाधारित रोस्टरनुसार अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, याची स्वतंत्र, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच शिक्षण, गृह, सामाजिक न्याय, पोलीस विभाग आणि मागासवर्गीय कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती तसेच पोलीस भरतीच्या विविध जिल्हे, संस्था आणि संवर्गनिहाय जाहिरातींचा अभ्यास केल्यानंतर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. काही जाहिरातींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी पदसंख्या शून्य दर्शविण्यात आली आहे. मात्र संबंधित संवर्गाची मंजूर पदसंख्या, शासनमान्य पदाधारित रोस्टर, प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी, आरक्षित पदांचा अनुशेष, रिक्त झालेल्या पदांचे रोस्टर बिंदू आणि जाहिरातीतील पदसंख्या यांचा ताळमेळ तपासल्याशिवाय या जाहिरातींची वैधता निश्चित करता येणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Swapnil lande : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुंकतो अन् म्हणतो ‘अडचण आली तर माझ्याकडे ये’

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, रिक्त पदांवर सरसकट आरक्षणाची टक्केवारी लागू करण्याची मागणी नसून, शासनाने ज्या पदाधारित रोस्टरनुसार भरती प्रक्रिया राबविल्याचा दावा केला आहे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, याची रोस्टर बिंदूनिहाय तपासणी करावी.

मंजूर पदसंख्या, प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी, आरक्षण रोस्टर आणि प्रत्येक रिक्त पदाचा रोस्टर बिंदू सार्वजनिक केल्यास भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल. संबंधित प्रवर्गाचे निर्धारित प्रतिनिधित्व पूर्ण झालेले नसताना किंवा अनुशेष अस्तित्वात असताना जाहिरातीत त्या प्रवर्गासाठी पदे शून्य दाखविण्यात आली आहेत का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवरील २०२६ मधील शिक्षक भरतीच्या सर्व जाहिरातींची स्वतंत्र रोस्टर तपासणी करावी, अशी मागणी पातोडे यांनी केली आहे. प्रत्येक शाळा आणि संस्थेची मंजूर पदसंख्या, प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी, शासनमान्य पदाधारित रोस्टर, अनुशेष आणि जाहिरातीत प्रसिद्ध केलेली प्रवर्गनिहाय पदे यांचा ताळमेळ तपासावा.

Melghat Ashram School : मेळघाटातील आश्रमशाळेत ‘भुताटकी’चे गूढ; विद्यार्थिनींमध्ये मास हिस्टेरियाची लक्षणे असल्याचा दावा

ज्या जाहिरातींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती किंवा भटक्या जमातींसाठी पदे शून्य दाखविण्यात आली आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून प्रत्येक प्रकरणाची चौकशी करावी. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या रोस्टर तपासणीचे प्रमाणपत्रही सार्वजनिक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!