व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra Fadnavis: उद्योग असो वा विकास महाराष्ट्र नंबर होता आणि राहील वन

Devendra Fadnavis: उद्योग असो वा विकास महाराष्ट्र नंबर होता आणि राहील वन

Chief Minister Confident Maharashtra Will Remain Number One in Development; Says in Independence Day Address : स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

Mumbai मंत्रालयात आयोजित ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याच्या आणि बंद पडत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बंद पडलेले उद्योग हे केवळ कागदावरच होते, ते प्रत्यक्षात कधी सुरूच झाले नव्हते. महाराष्ट्राची औद्योगिक घौडदौड कायम असून राज्य उद्योग आणि विकासात नंबर वन होते आणि भविष्यातही राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून विकसित भारताच्या स्वप्नामध्ये राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत राज्याचा आर्थिक विकास दर ८.८ टक्के नोंदवला गेला असून, केवळ ठराविक शहरांचाच नाही तर गडचिरोली, पालघर आणि नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांचाही समतोल विकास करून प्रत्येक जिल्ह्याला ग्रोथ इंजिन बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे.

Fda Action : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टच्या १४ केंद्रांवर एफडीएची कठोर कारवाई

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात येत असल्याचे सांगतानाच, येत्या वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय, येणाऱ्या पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असून जलसंधारणाच्या योजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. महिलांच्या सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत ‘महिला शेतकरी कायदा’ तयार करण्यात आला असून, महिलांना अधिकृतपणे शेतकऱ्याचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्र आज देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून सर्वाधिक परदेशी थेट गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्रातच होत आहे. भाषणाचा शेवटी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची आठवण ठेवून देश आणि राज्याच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

error: Content is protected !!