व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Kishor jorgewar: चंद्रपुरात भाजपच्या आमदाराची दुहेरी फजिती: एका बाजूला अतिक्रमणावर बुलडोझर, तर...

Kishor jorgewar: चंद्रपुरात भाजपच्या आमदाराची दुहेरी फजिती: एका बाजूला अतिक्रमणावर बुलडोझर, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांवरील डाव उच्च न्यायालयात उघडा

Double setback for BJP MLA in Chandrapur: Bulldozer action and High Court blow expose the political game: महापालिकेच्या कारवाईत आमदारांच्या कुंपणावरही बुलडोझर; हवेली गार्डनमधील अतिक्रमणावर धडक कारवाई

 

Chandrapur : सत्ताधारी पक्षात असूनही जिल्ह्यात स्वपक्षीयांनाच नडणारे भाजप आमदार किशोर जोरगेवार सध्या दुहेरी राजकीय संकटात सापडले आहेत. एकीकडे त्यांच्या बेकायदेशीर बांधकामावर थेट महापालिकेचा बुलडोझर फिरल्याने नामुष्की ओढवली आहे, तर दुसरीकडे पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला तडीपार करण्याचा राजकीय कट उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीमुळे उघडा पडला आहे. या दोन लागोपाठ बसलेल्या धक्कादायक प्रकारांमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात आमदारांच्या फजितीची जोरदार चर्चा रंगली आहे.

चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपचे माजी नगरसेवक अजय सरकार यांच्यावर रामनगर पोलिस ठाण्यातील जुन्या गुन्ह्यांचा आधार घेत तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने आणि आमदारांच्या हस्तक्षेपातून झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. शेवटी याप्रकरणी उच्च न्यायालयाने तडीपारीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिल्याने, जोरगेवार यांनी रचलेला राजकीय कट त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र आहे.

Nagpur municipal corporation: भाजपचे शिक्षण सभापती हिंदीतून बोलायला लागले, काँग्रेस नगरसेवकाने टोकले

एकीकडे न्यायालयात फजिती झाली असतानाच, हवेली गार्डन परिसरातील व्यावसायिक अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई केली. यावेळी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आमदार जोरगेवार यांच्या मालकीचे कुंपण आणि भिंतही अतिक्रमणात येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका पथकाने कोणतीही हायगय न करता थेट आमदाराच्या कुंपणावर बुलडोझर फिरवून अतिक्रमण धाराशाही केले. सत्ताधारी आमदाराच्याच मालमत्तेवर बुलडोझर चालल्याचे पाहून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

FDA : सुटे खाद्यतेल विकले तर कारवाई अटळ; तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना थेट इशारा

आमदार जोरगेवार भाजपमध्ये आल्यापासूनच त्यांनी स्थानिक नेत्यांशी आणि महापालिकेच्या राजकारणात अतिरेकी हस्तक्षेप करून वाद ओढवून घेतले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत फेरफार करणे, ‘डुप्लिकेट एबी फॉर्म’ देऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधातच बंडखोरांना पाठबळ देणे अशा कारवायांमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. याची गंभीर दखल पक्षामार्फत घेण्यात आली आहे. आता उच्च न्यायालयाचा दणका आणि अतिक्रमणावरील बुलडोझर कारवाई या दोन लागोपाठ घटनांमुळे आमदार जोरगेवार चंद्रपूरच्या राजकारणात चांगलेच एकाकी पडल्याचे दिसतात.

error: Content is protected !!