व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : १३ नगरसेवकांचे पत्र दाखवा; एक लाख एक रुपये...

Akola Municipal corporation : १३ नगरसेवकांचे पत्र दाखवा; एक लाख एक रुपये घेऊन जा, काँग्रेस नेत्याचे आव्हान

Congress leader alleges BJP trying to divert attention from the issue of corruption : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप

Akola महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणावर उत्तर देण्याऐवजी विरोधकांमध्ये संभ्रम आणि गैरसमज निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी केला आहे.

महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनासह कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात डॉ. हुसेन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अकोलेकरांच्या हितासाठी ही न्यायालयीन लढाई सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपकडे काँग्रेसच्या १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हुसेन यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र दाखवा आणि एक लाख एक रुपये घेऊन जा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणतेही दहा टक्के कमिशन न घेता पूर्ण रक्कम देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

Amravati District women’s hospital : पाच जण निलंबित; मात्र इतर दोषींवर कारवाई कधी?

महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा न्यायालयात गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता वाढल्याचा दावा डॉ. हुसेन यांनी केला. या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी दर दोन-तीन महिन्यांनी विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.
“अकोलेकरांच्या पैशांचा आणि हिताचा प्रश्न असल्याने ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून भ्रष्टाचाराविरोधात आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सत्य समोर येईल आणि जनतेला नेमके वास्तव कळेल,” असा विश्वास डॉ. झिशान हुसेन यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!