व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ‘मर्यादेत राहा, अन्यथा मारल्याशिवाय राहणार नाही’; भाजप आमदाराचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

‘मर्यादेत राहा, अन्यथा मारल्याशिवाय राहणार नाही’; भाजप आमदाराचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांसह बँकेत पोहोचले; आमदारांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

Amravati अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत ते अचलपूर तालुक्यातील एका बँकेत शेतकऱ्यांसह पोहोचले. कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही बँकेकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली होती. त्यानंतर आमदारांनी बँक शाखेला भेट देत शाखा व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी कर्जमाफीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास न देता त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बँकेतून बाहेर पडताना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या कथित इशाऱ्याची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. ‘व्यवस्थित राहा, लाईन-दोरीत राहा. आम्ही तुम्हाला भाऊ मानतो, तुम्हीदेखील आम्हाला भाऊ माना. सामान्य शेतकऱ्यांना सहकार्य करा,’ असे आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याचे सांगण्यात येत आहे.

कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

त्यानंतर त्यांनी कठोर शब्दांत इशारा दिल्याची चर्चा असून, या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेची सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

बल्लारपूर, ब्रह्मपुरी व जिवतीच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही बँक स्तरावर अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी भूमिका आमदारांनी या भेटीत मांडल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आमदारांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदारांनी अधिकाऱ्यांना केलेला इशारा हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होता की अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याच्या स्वरूपाचा होता, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.

 

error: Content is protected !!