व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ‘अभी नहीं तो कभी नहीं’, २०२७ उजाडण्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच

‘अभी नहीं तो कभी नहीं’, २०२७ उजाडण्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार; २८ सप्टेंबरला १२० तालुक्यांत जनजागरण

Akola ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या घोषणेअंतर्गत ‘मिशन २०२७’च्या माध्यमातून विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमध्ये जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी गावागावांत आणि शहराशहरांत जनसंकल्प मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली.

२८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी

२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारातील अटींची पूर्तता झाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. नागपूर करार कुचकामी ठरल्याचे सांगत २८ सप्टेंबर २०२६ रोजी विदर्भातील १२० तालुक्यांमध्ये ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. शहीद-ए-आझम भगतसिंग यांना अभिवादन केल्यानंतर विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.

‘मर्यादेत राहा, अन्यथा मारल्याशिवाय राहणार नाही’; भाजप आमदाराचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

सेवाग्राम ते वर्धा बाईक रॅली

महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमापासून १०० बाईकची रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणारी ही रॅली काला नाका, आर्वी रोड येथील विदुला रुख्मिणी सभागृहापर्यंत जाणार आहे. दुपारी १ वाजता रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

२६ ऑक्टोबरला अकोल्यात जनसंकल्प मेळावा

२६ ऑक्टोबरला अकोला येथील प्रमिलाताई टोपले सभागृहात दुपारी १२ वाजता ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह पश्चिम विदर्भातील विदर्भवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

विदर्भाच्या विकासातील अनुशेषाचा मुद्दा उपस्थित करत समितीने सिंचन, उद्योग, ऊर्जा, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, आदिवासी विकास, ग्रामविकास आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये विदर्भावर अन्याय झाल्याचा दावा केला. सिंचन प्रकल्प, रोजगार, शेतकरी प्रश्न, कुपोषण आणि नक्षलवादासारख्या सामाजिक-आर्थिक समस्यांवर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच उपाय असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

‘ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज्य चाहिए’ या भूमिकेतून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निकाली काढण्यासाठी सातत्याने जनजागरण सुरू ठेवणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप, उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद तायडे, धनंजय मिश्रा, सुरेश जोगळे, डॉ. पी. आर. राजपूत, अकोला जिल्हाध्यक्ष गजाननराव भटकर, गजानन आमदाबादकर, सतीश देशमुख, शंकरराव केवर, महिला महानगर अध्यक्षा सुनीता कौस्कार, जिल्हाध्यक्षा मीनाताई कवडे आदी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!