व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजप नगरसेवकांसाठी निधीचा कट ऑफ ‘१०० मतदार’; पदवीधरसाठी फॉर्म्युला हिट

भाजप नगरसेवकांसाठी निधीचा कट ऑफ ‘१०० मतदार’; पदवीधरसाठी फॉर्म्युला हिट

पदवीधरांचे अर्ज भरण्यासाठी दिले टार्गेट, नगरसेवकांची कोंडी

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून लाखभर मतदारांच्या नोंदणीचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र भाजपने अत्यंत आक्रमक आणि आगळ्यावेगळ्या रणनीतीने काँग्रेसची कोंडी केली आहे.

मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव करत इतिहास घडवला होता, त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा वंजारीच मैदानात उतरणार हे स्पष्ट आहे. मात्र, हा पराभव पचवून ही जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने सत्तेचा आणि निधीचा थेट वापर करत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचा नवा ‘फॉर्म्युला’ अमलात आणला आहे. जिल्हा नियोजन समितीचा विकासनिधी हवा असल्यास किमान १०० पदवीधरांचे अर्ज भरा असा कडक नियम लागू केला आहे. हाच नियम नगरसेवकांनाही महापालिकेच्या निधीसाठी लागू करण्यात आला आहे. या नोंदणीची थेट पडताळणी करण्याचे सर्वाधिकार भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना देण्यात आले असून, पक्षाच्या शहर कार्यालयात हायस्पीड झेरॉक्स, प्रिंटर आणि संगणक कर्मचाऱ्यांची एक विशेष ‘वॉर रूम’च तयार करण्यात आली आहे.

‘मत चोरी’च्या आरोपावरून काँग्रेसचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

या कडक शिस्तीमुळे महापालिकेतील गब्बर पदाधिकाऱ्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांचीच पळापळ झाली असून, अवघ्या दोन आठवड्यांत भाजपने आपल्या मतदारांची संख्या तब्बल २१ हजारांनी वाढवून काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी घेतलेल्या सुरुवातीच्या आघाडीवर पूर्णपणे मात केली आहे. दुसरीकडे, मतदार नोंदणीची ही चक्रे सुसाट फिरत असली तरी भाजपमधील उमेदवारीचा पेच मात्र अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. पक्षाने अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. वर्षभरापासून नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार सुधाकर कोहळे हे तिकीटाचे प्रबळ दावेदार मानले जात असतानाच, माजी आमदार अनिल सोले यांनीही आपली दावेदारी ठोकली आहे.

विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार

त्यातच संघाचे स्वयंसेवक रमण सेनाड यांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे, ज्यामुळे बाहेरून उमेदवार आयात करणे भाजपला अवघड झाले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे.

 

error: Content is protected !!