व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘देशातील राजकीय वातावरण बदलतेय’ विश्वंभर चौधरींचे २०२९च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत!

‘देशातील राजकीय वातावरण बदलतेय’ विश्वंभर चौधरींचे २०२९च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत!

गांधी विचारांच्या संदर्भातून आजच्या राजकारणाचा वेध

Wardha : देशातील सध्याचे राजकीय वातावरण, बदलती राजकीय समीकरणे आणि लोकशाहीसमोरील आव्हाने यांचा संदर्भ घेत ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी आगामी राजकारणाबाबत भाष्य केले. २०२९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गांधी जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि प्रहार सोशल फोरमच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

‘भारतीय राजकारणाची वर्तमान स्थिती व गांधी’ या विषयावर बोलताना चौधरी यांनी थेट पक्षीय राजकारणावर टीका करण्यापेक्षा देशातील सध्याच्या राजकीय वातावरणाचा व्यापक संदर्भ मांडला. राजकारणात विचार, मूल्ये आणि लोकशाही संस्थांची भूमिका यावर त्यांनी भाष्य केले. सत्तेचे राजकारण बदलत असते; मात्र समाजाला दिशा देणारे विचार दीर्घकाळ टिकतात, असा सूर त्यांच्या मांडणीतून उमटला.

गांधी हे केवळ एक व्यक्तिनाम नसून एक विचार असल्याचे सांगत चौधरी यांनी महात्मा गांधींच्या सर्वसमावेशक भूमिकेचा दाखला दिला. गांधींचा विरोध करणारेही सार्वजनिक जीवनात गांधींच्या विचारांचा उल्लेख करतात, असे ते म्हणाले. देशातील राजकीय वातावरणात मतभेद तीव्र होत असताना संवाद, समावेशकता आणि विविध विचारांना स्थान देण्याची गरज अधिक वाढते, असा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी भाषणातून दिला.

मोदींना बॅग पॅक करावी लागेल; ठाकरे बंधुंच्या मोर्च्यापूर्वी संजय राऊतांचा मोठा दावा

महात्मा गांधी, नथुराम गोडसे, विनायक दामोदर सावरकर आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या राजकीय विचारसरणीचा संदर्भ देताना चौधरी यांनी फाळणीच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले. गांधींची भूमिका ही सर्वसमावेशक राष्ट्रवादाची होती, तर त्यांच्याविरोधातील विविध विचारधारांमध्ये राष्ट्राच्या भवितव्याबाबत वेगवेगळ्या संकल्पना होत्या, असे त्यांनी नमूद केले.

गडचिरोलीच्या वनसंपदेतून गावांच्या विकासाला नवा निधी?

याच पार्श्वभूमीवर त्यांनी २०२९च्या लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय अंदाज व्यक्त केला. सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या जागा १५०च्या पुढे जाणार नाहीत, असे भाकीत करताना त्यांनी भविष्यातील राजकारणात बदलत्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा प्रभाव महत्त्वाचा ठरेल, असे संकेत दिले. तसेच केंद्रातील विद्यमान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल की नाही, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

error: Content is protected !!