व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी काँग्रेसची जिल्हाभर पदयात्रा

‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी काँग्रेसची जिल्हाभर पदयात्रा

दोन महिन्यात पाच लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

Yavatmal: निवडणूक प्रक्रिया, मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात पुढील दोन महिने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये जनजागृती पदयात्रा आणि गावोगावी नुक्कड सभांचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून किमान पाच लाख नागरिकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने निश्चित केले आहे.

अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा जिल्हा प्रभारी शाकीर सनदी यांनी ही घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह केंद्र सरकारच्या भूमिकेवरून देशभरात चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे अभियान हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कुराणासोबत गीता हाती घेणाऱ्या मुस्लिम कन्येचा संदेश : धर्माच्या पलीकडे माणुसकी; सुधीर मुनगंटीवारांचे मोलाचे सहकार्य!

या अभियानादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान ५० गावांमध्ये नुक्कड सभा घेतल्या जाणार आहेत. या सभांच्या माध्यमातून नागरिकांना लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेबाबत जागरूक करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध तालुक्यांत पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गावपातळीवर अभियान पोहोचवून अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होणार असून, नागरिकांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

जरांगेंच्या ५०० कोटींच्या ‘ऑडिओ बॉम्ब’ने राजकारण तापले

दरम्यान, येत्या रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी यवतमाळ जिल्ह्यातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पुढील दोन महिन्यांत राबविण्यात येणाऱ्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक, आमदार बाळासाहेब मांगुळकर, भैया पवार, अशोक बोबडे, जावेद अन्सारी, संजय वानखेडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!