व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा आखाडा तापला १२ जागांसाठी २६ उमेदवार!

तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा आखाडा तापला १२ जागांसाठी २६ उमेदवार!

सत्ताधारी आणि विरोधकात चुरशीची लढत, राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Malegaon : २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एका जागेची निवड बिनविरोध झाली असून, उर्वरित १२ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटासह विरोधकांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होताच विविध राजकीय गट आणि पॅनलच्या नेत्यांनी प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, संस्थेचा कारभार, सभासदांचे हित आणि विकासकामांचे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. गावोगावी बैठका, मतदारांच्या भेटीगाठी आणि गटबांधणीला वेग आला असून, मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी मुनगंटीवारांचे पहिले पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

संलग्न सभासद मतदारसंघातील सहा जागांसाठी तब्बल १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये परमेश्वर वाझुळकर, भारत केळे, कैलासराव घुगे, रामभाऊ नवघरे, भिकारात घुगे, भारत जोगदंड, राजेश जाधव, गणेश घुले, गजानन गवळी, प्रकाश कुटे, गजानन मापारी, संजय देशमुख आणि सुरेश पाटील यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

वैयक्तिक सभासद मतदारसंघातील दोन जागांसाठी भगवान शिंदे, अशोकराव गवळी, सुभाष देवळे आणि योगेश सोभागे असे चार उमेदवार मैदानात आहेत. महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी शोभा कुटे, लीलावती शिंदे, गयाबाई टेकाळे आणि वैशाली केळे यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) एका जागेसाठी सुरेश शिंदे, शंकरराव अवचार आणि अशोकराव गवळी यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका जागेसाठी सुरेश जामकर आणि संदीप सावळे यांच्यात थेट लढत होईल.

कामांचे श्रेय घेताना भाजपच्या पुढे, अडथळे आले की भाजपवरच आरोप

भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठी २६ उमेदवारांमध्ये राजकीय संघर्ष रंगणार आहे. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोणता गट मतदारांवर प्रभाव निर्माण करतो आणि सभासदांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. २२ नोव्हेंबरच्या मतदानातून संस्थेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!