व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकारण तापले; काँग्रेसचा कडाडून विरोध, तर ‘इंडिया’ आघाडीत फुटीची...

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकारण तापले; काँग्रेसचा कडाडून विरोध, तर ‘इंडिया’ आघाडीत फुटीची शक्यता

विधेयके खर्चिक ठरणार असल्याची नाना पटोले यांची टीका, केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय

Nagpur केंद्र सरकारकडून ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ पुन्हा एकदा संसदेत सादर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत या विधेयकाला पाठिंबा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला असून, हे विधेयक अत्यंत खर्चिक ठरणार असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. या विधेयकानंतर देशातील खासदारांची संख्या ८०० च्या घरात जाणार आहे. इतक्या मोठ्या मतदारसंघांमध्ये निवडणुका घेणे, खासदारांचे मानधन, त्यांची पेन्शन आणि लोकप्रतिनिधींवर होणारा सर्व खर्च सरकारच्या तिजोरीतून जाणार असून, याचा फटका शेवटी जनतेलाच बसणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

गडचिरोलीतील असंतोषावर डिजिटल प्रचाराचा उतारा? सरकारला समाजमाध्यमांचा आधार!

मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या खर्चाचाही विचार करणे आवश्यक आहे. खासदार व इतर लोकप्रतिनिधींच्या संख्येत वाढ होईल, मात्र त्याचा जनतेला फारसा काही फायदा होणार नाही. त्यामुळे कोणीही पाठिंबा दिला तरी काँग्रेस या विधेयकाच्या विरोधात ठाम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी विरोधकांनी हे विधेयक फेटाळून लावले होते. लोकसभेत आवश्यक संख्याबळ नसल्याने हे विधेयक पडले होते, ज्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला होता. आता नव्याने हे विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. सध्या तृणमूल काँग्रेसचे २० खासदार भाजपसोबत असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे ८ खासदार आहेत. दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी १० ते १२ खासदारांची गरज आहे. हे संख्याबळ जुळताच पुन्हा एकदा विधेयक सादर केले जाणार आहे.

राष्ट्रवादी महायुतीत का आली? अमित शाहांनी पुण्यात सांगितला अजितदादांचा खास किस्सा

या विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसचा विरोध कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेस व इतर काही छोटे पक्ष प्रत्यक्ष मतदान किंवा अनुपस्थित राहून विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने ‘इंडिया’ आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

error: Content is protected !!