Chief Minister’s support to tribal youth fighting death : भामरागड तालुक्यातील गरीब कुटुंबाने दिली होती हाक
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख संवेदनशील राजकारणी अशी असून त्याची प्रचिती परत एकदा आली आहे. गडचिरोलीतील एका आदिवासी युवकाच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात दिला.
भामरागड तालुक्यातील गरीब घरातील एका आदिवासी युवकाच्या उपचारासाठी आईने मंगळसूत्र विकले तर वडिलांनी व्याजाने पैसे घेतले. पण पैसे कमी पडल्याने दोघेही हताश झाले. पित्याने मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून विनवणी केली होती. याची दखल मुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून संपूर्ण उपचार मोफत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
Dr. Prakash Amte : डॉ. आमटेंनी मांडले आदिवासी भागातील वास्तव
सुनील रमेश पुंगाटी (१७, रा. हितापाडी, ता. भामरागड) याच्यावर २५ जानेवारीपासून नागपूरमधील गांधीबाग परिसरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्याला मेंदूचा क्षयरोग झाला आहे. तो व्हेंटिलेटरवर असून, प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला वडिलांनी पत्नी सुनीताचे मंगळसूत्र मोडून व काही पैसे व्याजाने घेऊन उपचारावर एक लाख रुपये खर्च केला. पण दवाखाना प्रशासनाने पुढील उपचारासाठी आणखी एक लाखाची मागणी केली.
तीन-चार दिवसांपासून उपाशी असलेल्या या दाम्पत्यापुढे उपचारासाठी पैसे कसे उभे करायचे, हा प्रश्न होता. रमेश पुंगाटी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून ‘साहेब, तुम्हीच पालक, माझ्या मुलाला वाचवा…’ अशा विनवणीचे पत्र लिहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाने दवाखाना प्रशासनाशी संपर्क करून मुख्यमंत्री सहायता निधीतून मोफत उपचार करा, या मुलाच्या उपचारात कुठलीही हलगर्जी करू नका…असे कळविले.
Dr. Pankaj Bhoyar : प्रदर्शनातून घडावेत भविष्यातील वैज्ञानिक
फडणवीस यांनी स्वत: सुनीलच्या आजाराची व उपचाराची विचारणा केली. रुग्णाला कोणताही त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्याबाबत निर्देश दिले. सर्व औषधोपचार मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत मोफत करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायती निधीचे विदर्भ कक्ष प्रमुख डॉ.सागर पांडे यांनी सांगितले.