used to steal expensive bikes; Thieves arrested in Nagpur : पोलिसी हिसक्या दाखवताच दिली गुन्ह्यांची कबुली
Wardha शहरातून महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगार असलेल्या अट्टल चोरट्यांना शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने नागपुरात बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीतील दुचाकी हस्तगत करत दुचाकी चोरीचे तीन गुन्ह्यांची उकल केली. मयूर गजानन नाकाडे (२३, रा. कारला चौक), मनीष उर्फ बिल्ला मनोज मसराम अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.
पवन पंजाब ठाकरे रा. गणेशनगर यांची एमएच. ३२ यू. ९६७४ क्रमांकाची दुचाकी पोस्ट ऑफीससमोरुन तसेच नीलेश दिगांबर पेंदाम, रा. प्रतापनगर यांची एमएच. ३२ एयू. ३३१४ क्रमांकाची दुचाकी शिवाजी चौकातून तर नारायण संतोष वरणे, रा. वायगाव यांची एमएच ३२ एस. ७१६४ क्रमांकाची दुचाकी शिवाजी चौकातील हॉस्पिटल परिसरातून चोरी गेली होती.
CM Devendra Fadnavis : प्रधानमंत्री आवास घरकुलांच्या कामांना गती द्या
याप्रकरणी शहर पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी तपासचक्र फिरवले आणि वर्ध्यातील दोन अट्टल चोरट्यांना नागपुरातून अटक केली. शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथक चोरट्यांच्या शोधात होते. त्यांना चोरटा मयूर नाकाडे हा नागपूर येथे चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने थेट नागपूर येथे जात तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.
CM Devendra Fadnavis : जलसंधारण प्रकल्पांसाठी आता नवीन Policy!
विचारपूस केली असता एक दुचाकी घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यास अटक करून घरी जात दुचाकी हस्तगत केली. तसेच बुरड मोहल्ल्यातील रहिवासी मनीष उर्फ बिल्ला यानेही दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यास पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडूनही दुचाकी हस्तगत करत दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उजेडात आणले.







