व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati Mayour : महापौरांच्या भावांचा नूडल्सचा कारखाना; एफडीएची कारवाई, दोन्ही परवाने निलंबित

Amravati Mayour : महापौरांच्या भावांचा नूडल्सचा कारखाना; एफडीएची कारवाई, दोन्ही परवाने निलंबित

FDA takes action against Amravati Mayor’s brothers’ noodle factory; both licences suspended : रामपुरी कॅम्पमधील दोन केंद्रांवर धडक तपासणी; अस्वच्छ वातावरणात नूडल्स निर्मितीचा आरोप

Amravati रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी भागात अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या दोन नूडल्स निर्मिती केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यानंतर लालचंद तेजवाणी आणि सुनील तेजवाणी यांच्या नावे असलेल्या दोन्ही व्यवसायांचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. लालचंद आणि सुनील तेजवाणी हे अमरावतीच्या महापौरांचे भाऊ असल्याने या कारवाईची विशेष चर्चा सुरू आहे.

रामपुरी कॅम्प परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी भागातच नूडल्स निर्मितीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.

नूडल्स निर्मितीनंतर उरलेले पदार्थ उघड्यावर टाकले जात असल्याने परिसरातील स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.

Amravati district women’s hospital : डफरीन अग्निकांडात मोठी कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागातील तिघांचे निलंबन

तपासणीत काय आढळले?

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत एफडीएच्या पथकाने बुधवारी दोन्ही केंद्रांवर अचानक तपासणी केली. अत्यंत अरुंद, कोंदट आणि अस्वच्छ जागेत नूडल्सची निर्मिती केली जात असल्याचे तपासणीत आढळून आल्याची माहिती आहे.

तयार केलेले नूडल्स बाहेरील खुल्या जागेत धूळ आणि अस्वच्छ वातावरणात वाळविण्यात येत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. अन्नपदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

Water crisis : पाणीटंचाईच्या संकटाआधीच नियोजन; अकोल्यासाठी तीन पर्यायी जलस्रोतांचा विचार

शहरातील हॉटेल्स, चायनीज गाड्यांना पुरवठा?

रामपुरी कॅम्प येथील या केंद्रांमध्ये तयार होणारे नूडल्स शहरातील विविध चायनीज गाड्या, हॉटेल्स आणि बाजारपेठेत पुरविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने घटनास्थळावरून नूडल्ससह इतर संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

नमुना तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी दोन्ही व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आल्याने खाद्यपदार्थ निर्मिती आणि पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

error: Content is protected !!