Magel Tyala Krushi Pump Yojana : १०० दिवसांचे उद्दीष्ट ६० दिवसांत पूर्ण!

100 day goal completed in 60 days : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेने घेतली आघाडी

Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या १०० दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ महावितरणने अवघ्या ६० दिवसांत पूर्ण केली आहे. या कालावधीत ५२,७०५ सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट होते. मात्र ५३,००९ पंप बसवून महावितरणने उद्दीष्ट ओलांडले असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर १६ मार्च २०२५ पर्यंतच्या शंभर दिवसांसाठी विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली. महावितरणने या कालावधीत “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” अंतर्गत एकूण दीड लाख पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठरवले होते.

148 encroachments in Shivangaon removed : विमानतळ नूतणीकरणाचे टेक-ऑफ!

६ डिसेंबरपर्यंत ९७,२९५ सौर कृषी पंप बसविण्यात आले होते. त्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत ५३,००९ नवीन सौर कृषी पंप बसवले गेले. त्यामुळे या योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची एकूण संख्या १,५०,३०४ झाली आहे.

४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बसविण्यात आलेल्या १,५०,३०४ सौर कृषी पंपांमध्ये जालना, बीड, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. जालना – १८,४९४, बीड – १७,९४४, अहिल्यानगर – १३,३६६, परभणी – ११,७५५, संभाजीनगर – ९,३२९, नाशिक – ९,१४३, हिंगोली – ८,५३८, धाराशीव – ६,७६५, जळगाव – ६,६४८ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आघाडी घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.

या योजनेत केंद्र सरकारकडून ३०% आणि राज्य सरकारकडून ६०% अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा केवळ ५% असून, त्यांना ९५% अनुदान मिळते.

सौर कृषी पंप बसविल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध होते. त्यामुळे त्यांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होते. हे पंप वीज जाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी हव्या त्या वेळी सिंचन करू शकतो. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने, कृषी पंपासाठी वीजबिलातून मुक्तता होते.

PDKV Akola : ४ हजार ४० स्नातकांना होणार पदवी प्रदान!

मागील वर्षभरात या मोहिमेला विशेष गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याने देशात सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. २०१५ पासून २०२३ पर्यंत महावितरणने १,०६,६१६ सौर कृषी पंप बसवले होते. मात्र, जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या अवघ्या १४ महिन्यांत दीड लाख पंप बसवून महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.