Murder in Amravati : महिनाभरापासून बेपत्ता होता; थेट मृतदेहच सापडला!

A Youth had been missing for a month; body found : डोके आणि हात शरीरापासून वेगळे, हत्येचा संशय

Amravati मोर्शीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्परवर्धा धरणाच्या जवळ, जोलवाडी रस्त्यालगतच्या वनविभागाच्या जंगलात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे डोके आणि हात शरीरापासून अलग करण्यात आल्याने ही निघृण हत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ही घटना शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृतकाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. मृत तरुणाचे नाव दुर्गादास पांडुरंग नेहारे (३०, रा. मायवाडी) असे आहे. तो ६ जानेवारीपासून बेपत्ता होता, आणि त्याच्या कुटुंबीयांनी मोर्शी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागत नव्हता.

Morna Ghat will be developed : राजेश्वर मंदिराचा होणार कायापालट !

शनिवारी सकाळी, जोलवाडी वनविभागाच्या जंगलात काम करणाऱ्या तीन मजुरांना छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशात आधारकार्ड सापडल्याने त्याची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याने मोर्शी पोलिसांना कळवले. त्यानंतर, मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार नितीन देशमुख, स्कॉड पोलिस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल, तसेच आष्टीचे ठाणेदार मंगेश भोयर घटनास्थळी दाखल झाले.

याशिवाय, वर्धा जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मकेश्वर, एलसीबी पथक आणि श्वान पथक यांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला गती दिली. आष्टी पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Uday Samant : उदय सामंतांना आवडली कौस्तुभ आमटेंची शैली !

पोलिसांना संशय
दुर्गादास हा गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता, मात्र तो या कालावधीत कोठे राहत होता, कोणासोबत त्याचे संबंध होते आणि त्याला कोणाचे फोन येत होते? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पोलिस विविध शक्यता तपासत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.