व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Congress : काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात; अनेकांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा

Akola Congress : काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात; अनेकांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा

Congress Sees Strong Influx as Hundreds of Workers from Mana Area Join the Party : माना परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; मेघना केकन यांची जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती

Akola अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील माना परिसरात काँग्रेसने संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने मोठी मोर्चेबांधणी केली. मेघना सचिन केकन यांनी सुमारे ५०० समर्थक व कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मेघना केकन यांची अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

येथील स्वराज भवन या जिल्हा काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मेघना केकन यांच्यासह माना परिसरातील कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोहेल खान रफिक भाई यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षात समावेश करण्यात आला. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे काँग्रेसचा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले.

Draught relief meeting : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी, नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाचे सदस्य न राहता काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचारक म्हणून गावागावांत काम करावे, असे आवाहन केले. माना परिसरातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रशासकीय तयारी वेगात; अमरावतीत ६ हजार बीयू दाखल

यावेळी काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून आगामी काळात पक्षाच्या संघटनवाढीसाठी काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला माना येथील अरुण दाऊद, विलास देशमुख, मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू जोगदंड, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मोहन अभ्यंकर, भारत इंगळे, महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई आदी उपस्थित होते. महानगर अध्यक्ष महेंद्र गवई आणि मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू जोगदंड यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन तश्‍वर पटेल यांनी केले, तर सचिन केकन यांनी आभार मानले.

error: Content is protected !!