Amravati Congress: काँग्रेस Confident, महापालिका निवडणूक जिंकणारच!

Congress is confident of winning the municipal elections : अमरावती शहर काँग्रेसचा निर्धार, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी घेतली बैठक

Amravati आगामी महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढू आणि जिंकूही, असा निर्धार शहर काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी सध्या महानगरपालिकेत सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवून शहराला नवीन दिशा देऊ, असा विश्वास व्यक्त केला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

Nagpur municipal corporation: शहरातील रस्तेच झाले डम्पिंग यार्ड!

बैठकीला माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भय्या पवार, माजी महापौर अशोक डोंगरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल रफिक, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, नसीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

“काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण विजय मिळवला. मात्र, विधानसभेत अपयश आले. आता महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे,” असे आवाहन शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी केले.

“काँग्रेस पक्षामध्ये काही भविष्य नाही” असे मानणाऱ्यांनी वेळ वाया घालवू नये आणि पक्ष सोडून जावे. मात्र, पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

Pyare Khan : उर्दू शाळांमधील गैरकारभाराला बसणार चाप

या बैठकीचे संचालन महासचिव सलीम मीरावाले यांनी केले, तसेच त्यांनी आभार मानले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या सुजाता झाडे, शोभा शिंदे, देवयानी कुर्वे, वंदना थोरात, अनिला काझी, अस्मा परवीन, लक्ष्मी अहिरे, भारती क्षीरसागर, शिल्पा राऊत, मनाली तायडे, अपर्णा मकेश्वर, अंजली उघडे, मेराज खान, सईद खान, सादिक शाह, नजीर खान बिके, धीरज हिवसे, महेश व्यास, किरण साऊरकर, दीपक हुंडीकर, डॉ. मतीन, अब्दुल रऊफ, अमर भेर्डे, प्रशांत महल्ले, रवींद्र शिंदे, प्रा. अनिल देशमुख, विजय बर्वे, अनिल माधोगढीया आदी पदाधिकारी उपस्थित होते.