Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !

Poors are suffering from ration shopkeepers : गरीबांना योजनेचा लाभ होण्याऐवजी होतोय त्रास

Amaravati गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकारने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोफत किंवा स्वस्त दरात राशन देण्याची योजना आणली. मात्र, ही योजना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जात आहे का? हा मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानदारांच्या मनमानीमुळे गरिबांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गरीब मजूर, कामगार, छोटे व्यावसायिक आणि इतर गरजू लोक राशनसाठी तासनतास रांगेत उभे असतात. अनेक दुकानदार आधीच रेशन कार्ड आणि अंगठ्याची नोंद घेतात, तरीही लाभार्थ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करायला लावतात. या प्रक्रियेमुळे त्यांचा संपूर्ण दिवस वाया जातो. एका बाजूला त्यांना स्वस्त दरात धान्य मिळत असले, तरी दुसऱ्या बाजूला त्यांचे रोजंदारीचे नुकसान होते.

Harshawardhan Sapkal : नेत्यांच्या घोडेबाजाराला आळा घालणार !

मोफत किंवा स्वस्त धान्य मिळत असले तरी, ते मिळवण्यासाठी गरिबांना आपल्या दैनंदिन कामाचा बळी द्यावा लागतो. अनेक जण हातावर पोट असणारे कामगार असतात. त्यांना रोज ३०० ते ५०० रुपये मिळतात. मात्र, राशन मिळवण्यासाठी त्यांना काम सोडावे लागते, परिणामी त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा खरा लाभ मिळण्याऐवजी त्यांना आर्थिक फटका बसतो.

काही रास्तभाव दुकानदार मुद्दाम अडथळे निर्माण करून गरिबांचे हाल करत आहेत. ते कमी प्रमाणात धान्य वाटप करतात, लाभार्थ्यांना नाहक थांबवतात, उद्धट वागतात आणि काही वेळा त्यांचे हक्काचे धान्य काळ्या बाजारात विकतात. काही दुकानदार उशिरा दुकान उघडतात, त्यामुळे गरिबांची गैरसोय होते. तसेच, काही वेळा ग्राहकांना कमी धान्य दिले जाते, त्यामुळे त्यांना शासनाने दिलेल्या संपूर्ण लाभापासून वंचित रहावे लागते.

Hasan Mushrif : मुश्रिफांना विश्वास, राज्य होईल Medical tourism centre !

हे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक रास्तभाव दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, डिजिटल ओळखपत्र प्रणाली लागू करणे आणि ऑनलाईन ट्रॅकिंग यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे गरिबांना त्यांच्या हक्काचे राशन योग्य वेळी मिळेल.

याशिवाय, शासनाने तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाइन सुरू करावी आणि गैरप्रकार करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी. योजनांची घोषणा करून थांबण्याऐवजी त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे का, यावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे.

गरिबांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने मिळण्यासाठी रास्तभाव दुकानदारांच्या मनमानीला आळा घालावा आणि गरिबांना त्यांचे हक्काचे राशन वेळेवर व पारदर्शक पद्धतीने मिळावे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यासच ही योजना यशस्वी ठरेल.