व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Lucknow coaching class case : बुलढाण्यात ७२ पैकी ७१ कोचिंग क्लासेसकडे अग्निसुरक्षा...

Lucknow coaching class case : बुलढाण्यात ७२ पैकी ७१ कोचिंग क्लासेसकडे अग्निसुरक्षा एनओसीच नाही; पालिकेची कारवाई अटळ

71 of the 72 coaching classes in Buldhana lack a fire safety NOC : लखनऊ दुर्घटनेनंतर बुलढाण्याचे धक्कादायक वास्तव; बहुतांश कोचिंग क्लासेस अग्निसुरक्षा नियमांपासून दूर

Buldhana लखनऊ येथील कोचिंग क्लासमधील दुर्घटनेनंतर राज्यभरात शिकवणी वर्गांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातील कोचिंग क्लासेसच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील ७२ कोचिंग क्लासेसपैकी केवळ एका संस्थेकडेच नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला (एनओसी) असून, उर्वरित ७१ क्लासेसनी अद्याप आवश्यक अग्निसुरक्षा मंजुरी घेतलेली नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

२०१९ मध्ये गुजरातमधील सुरत येथे कोचिंग क्लासमध्ये झालेल्या भीषण आगीत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाने शिकवणी वर्गांसाठी कठोर अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यानुसार प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचा स्वतंत्र मार्ग, सुरक्षित जिना तसेच अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, बुलढाणा शहरातील बहुतांश संस्थांनी या नियमांची अद्याप पूर्ण अंमलबजावणी केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protest for justice : भूमिहीनांचे ‘न्याय दो’ आंदोलन; शाहू महाराज स्मारकासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी

पालिका अग्निशमन विभागाने सुमारे दीड वर्षापूर्वी संबंधित कोचिंग क्लासेसना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर काही संस्थांनी अग्निशमन यंत्रणा बसविणे, मॉक ड्रिल आयोजित करणे, अग्निरोधक उपकरणे उपलब्ध करून देणे आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेक संस्थांचे अधिकृत अग्निसुरक्षा परीक्षण आणि एनओसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

शहरातील काही मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये अग्निशमन उपकरणे, अलार्म व्यवस्था आणि प्राथमिक सुरक्षा सुविधा उपलब्ध असल्या तरी अधिकृत ना-हरकत दाखला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Fake birth certificate : अमरावती मनपातील जन्म प्रमाणपत्र प्रकरण; घोटाळा की तांत्रिक बिघाड?

आता पुन्हा तपासणी; सात दिवसांची मुदत
लखनौ दुर्घटनेनंतर बुलढाणा नगरपालिकेने शहरातील सर्व कोचिंग क्लासेसची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना नियम, २००९ नुसार सर्व संस्थांची पाहणी करण्यात येणार असून, आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे.

निर्धारित कालावधीत नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास वीजपुरवठा खंडित करणे किंवा संबंधित इमारतीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोमवारपासून ही विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!