RPI’s public meeting in Malkapur in April : ७ एप्रिलला केंद्रीय राज्यमंत्र्यांची जाहीर सभा
Khamgao रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या तरीही जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मलकापूर येथून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत. ७ एप्रिलला त्यांची जाहीर सभा याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात ७ एप्रिल २०२५ रोजी मलकापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या तयारीसाठी अलीकडेच खामगाव येथील शासकीय विश्रांतीगृहात नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष (उत्तर) भाऊसाहेब सरदार होते. तर नियोजन जिल्हामहामंत्री पॅंथर भाई निळकंठदादा सोनोने यांनी केले. बैठकीत जिल्हाध्यक्ष (दक्षिण) इंजिनियर शरद खरात, जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे आणि विविध तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करून करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी ७ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेच्या व्यापक आयोजनावर चर्चा केली. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांनी पदाधिकाऱ्यांना सभा ऐतिहासिक करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी गावपातळीपासून प्रत्येक घराघरात संपर्क साधून रिपाईच्या विचारधारेचा प्रसार करावा, असंही ते म्हणाले.
बैठकीत रिपाईच्या पुढील ध्येयधोरणांवर चर्चा झाली. स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यात आली. तसेच “रिपाईची गाव तीथे शाखा, घर तीथे कार्यकर्ता” या अभियानाला अधिक गती देण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. नवीन कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
बैठकीचे प्रस्ताविक संतोषदादा वानखडे यांनी केले, तर सूत्रसंचालन पॅंथर निळकंठ सोनोने यांनी केले. शेगाव तालुकाध्यक्ष सुरज शेगोकार यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीची सांगता राष्ट्रगीताने झाली. ७ एप्रिलच्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.