Breaking

International Women’s day : कर्तृत्ववान महिलांचे ‘खणखणीत नाणे’!

(जागतिक महिला दिन विशेष)

Portraits of ten great women on Indian coins : भारतीय नाण्यांवर दहा थोर महिलांची छायाचित्रे

Akola जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांच्या नावाने वाजलेले खणखणीत नाणे आवर्जून चर्चेला येत आहे. भारतीय नाण्यांवरील दहा थोर महिलांची छायाचित्रे साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ठरली. यात राणी व्हिक्टोरियापासून सहजयोगच्या पुरस्कर्ता निर्मला देवींपर्यंत काहींचा समावेश आहे. जागतिक व ऐतिहासिक मुद्रा आणि चलन संग्राहक अक्षय प्रदीप खाडे यांनी दिली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८५ ते २०२४ या कालावधीत एकूण १० थोर महिलांची छायाचित्रे भारतीय नाण्यांवर प्रकाशित झालीत. विशेष म्हणजे, राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील पहिले आणि शेवटचे सोन्याचे नाणे १८४१ साली काढण्यात आले. या नाण्याचे वजन १०.६६ ग्रॅम होते. त्यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही, अशी माहिती अक्ष करन्सीजचे संचालक अक्षय खाडे देतात. अक्षय खाडे म्हणाले, ‘भारतात पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी मुंबईत साजरा झाला. त्यानंतर युनोने १९७५ हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून घोषित केले. १९७५ साली भारत सरकारने १० पैशांच्या नाण्यावर महिलांचे काल्पनिक चित्र छापून त्यावर ‘समानता, विकास, शांती’ हे घोषवाक्य छापले.”

One District One Crop : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला भरारी!

भारतीय नाण्यांवरील महिला

१९८५ : ५० पैसे व ५ रुपये – इंदिरा गांधी
२००९ : ५ रुपये व १०० रुपये – सेंट अल्फोंसा
२०१० : ५ रुपये व १०० रुपये – मदर टेरेसा
२०१४ : ५ रुपये व १०० रुपये – बेगम अख्तर
२०१५ : ५ रुपये व १०० रुपये – राणी गायी दिन्यालु
२०१६ : ५ रुपये व १०० रुपये – एम. एस. सुब्बू लक्ष्मी
२०२० : १०० रुपये – विजया राजे सिंधिया
२०२३ : ५२५ रुपये – संत मीराबाई
२०२३ : ५०० रुपये – राणी दुर्गावती
२०२४ : १०० रुपये – सहज योग पुरस्कर्त्या निर्मला देवी

जगातील काही निवडक देश आणि त्यांचे नाणे-चलनी नोटांवरील महिलांच्या छायाचित्रांमध्ये राणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तिन्ही देशांमध्ये राणी एलिझाबेथ यांचेच चित्र नोटांवर आणि नाण्यांवर आहे. तर कॅनडामध्ये व्हिओला डिस्मंड यांचे चित्र चलनावर बघायला मिळते.

Vijay Wadettiwar : बव्हंशी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते !

महिलांचा गौरव करण्याच्या दृष्टीने जगभरातील अनेक देशांनी त्यांच्या थोर महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी चलनी नोटा आणि नाण्यांवर त्यांची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. भारतानेही त्यात आपले योगदान दिले आहे.