Breaking

Shivaji Education Society : शरद पवार आणि नितीन गडकरी एका मंचावर

 

Sharad Pawar and Nitin Gadkari will share the stage in Amravati : ऐतिहासिक सोहळ्याची उत्सुकता; शिवाजी शिक्षण संस्थेचा पुरस्कार सोहळा

Amravati श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण शनिवार, २२ मार्चला अमरावती येथे होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेच्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार देखील आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

विदर्भातील दोन उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांना देखील या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी १०:३० वाजता पार पडणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन प्र. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

Nitin Gadkari : कंपन्यांनी Biofuel वर चालवाव्या मशिनरीज!

खासदार शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून आभासी स्वरूपात सहभागी होणार आहेत. राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात खासदार शरदचंद्र पवार यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील एका उत्कृष्ट महिला शेतकऱ्यास ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ देण्यात येईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आणखी एका महिला शेतकऱ्यास ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ प्रदान केला जाईल.

Teacher transfers : शिक्षकांच्या जिल्हा बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार !

पुरस्कारांचे स्वरूप

‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’
रु. १,११,१११ रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, १२५ रुपयांचे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती नाणे, साडी-चोळी, शाल व श्रीफळ.

‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार’
रु. ५१,००० रोख, स्मृतिचिन्ह, साडी-चोळी, शाल व श्रीफळ.

इतर विशेष पुरस्कार

‘श्रीमती विमलाबाई देशमुख (वैद्यकीय शिक्षण) अभ्यासवृत्ती’
‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (कृषी शिक्षण) अभ्यासवृत्ती’
‘डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार’ (माध्यमिक शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी)