Minister Gulabrao Patil : जलजीवन मिशनचे काम पूर्ण करा, नाही तर…

 

Complete the work of Jaljeevan Mission, otherwise action will be taken : पाणीपुरवठा मंत्र्यांचा कडक इशारा; आमदारांच्या पाठपुराव्यानंतर बैठक

Buldhana जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची संथ गती आणि त्यामुळे पाणीपुरवठ्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा कारवाईसाठी तयार राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आमदार श्वेता महाले यांच्या मागणीनंतर मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रधान सचिव (स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग), सदस्य सचिव (मजीप्रा), अभियान संचालक (जलजीवन मिशन), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, बुलढाणा) तसेच विविध स्तरांवरील अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मंत्री पाटील यांनी जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड देणाऱ्या सामान्य जनतेची स्थिती लक्षात घेऊन, कामे तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, कामे वेळेत पूर्ण न करणारे कंत्राटदार आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम थेट जनतेवर होत आहे. त्यामुळे संबंधित दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Sudhir Mungantiwar : विधानसभा अध्यक्ष म्हणाले, मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे !

पाणीपुरवठा योजनांचे गावनिहाय आणि कामनिहाय सखोल परीक्षण करण्यात आले. अपूर्ण कामांच्या कारणांची शोध घेऊन त्वरित मार्गदर्शन आणि उपाययोजना सुचवण्यात आल्या. गुणवत्तापूर्ण आणि वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अपूर्ण कामांमुळे त्रस्त असलेल्या गावांसाठी तातडीने मदत पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Meghna Bordikar : त्या घटनेचा गव्हाशी ‘केसा’चाही संबंध नाही!

जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारण्याचा उद्देश आहे. परंतु, अपूर्ण कामे आणि त्यातील अडथळ्यांमुळे गावकऱ्यांना पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी आता युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कार्यवाहीमुळे जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.