Breaking

Mahayuti Government : मोर्शीतील मत्स्यविज्ञान महाविद्यालयासाठी १६५ कोटी मंजूर

 

Rs 165 crore approved for Fisheries Science College in Morshi : पश्चिम विदर्भातील पहिलाच प्रकल्प; भूमिपूजनानंतर रखडला होता प्रकल्प

Amravati पश्चिम विदर्भातील पहिल्या शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या उभारणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे १६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे.

मोर्शी येथील अप्परवर्धा वसाहतीच्या आवारात ८ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे Anmil Bonde यांच्या पत्नी वसुधाताई बोंडे, नागपूर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर, सहकार भारतीचे मत्स्य प्रकोष्ठ प्रमुख वासुदेव सुरजुसे आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला होता. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांतच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव झाल्याने हा प्रकल्प रखडला. त्यानंतर तब्बल तीन वर्षे महाविद्यालयाच्या उभारणीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

Nitin Gadkari : भविष्य डोळ्यापुढे ठेवून शेतीत बदल करा!

२०२२-२३ मध्ये राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या महाविद्यालयाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. मात्र, २०२५ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात या महाविद्यालयासाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यामुळे हे महाविद्यालय वंचित राहणार असल्याची चर्चा सुरू झाली.

यानंतर २१ मार्च २०२५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोर्शी येथे नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकांसाठी सिंभोरा येथील राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्र नागपूर मत्स्य विज्ञान विद्यापीठाला विनामूल्य हस्तांतरित करण्यात आले आहे.

MP Amar Kale : भोयर-पवार समाजाचा OBC मध्ये समावेश करा

सुमारे सहा वर्षांपूर्वी हे महाविद्यालय मोर्शी तालुक्यातील पारडी येथे प्रस्तावित होते. मात्र, मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होत असलेल्या अप्परवर्धा पाटबंधारे वसाहतीत हे महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महाविद्यालयात शिक्षक संवर्गातील ३९ पदे आणि शिक्षकेतर संवर्गातील १५ पदे अशा एकूण ५४ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिक्षकेतर संवर्गातील ६२ पदे सेवा बाह्य यंत्रणेमार्फत टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार आहेत.

या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या मनुष्यबळासाठी पुढील पाच वर्षांसाठी २९.४८ कोटी रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या महाविद्यालयाच्या प्रशासकीय व शैक्षणिक इमारती, मुला-मुलींची वसतिगृहे, कर्मचारी निवासस्थाने, विश्रामगृह, व्यायामशाळा, अंतर्गत क्रीडा संकुल, प्रयोगशाळा इमारत, उपहारगृह, फर्निचर, उपकरणे आणि वाहन खरेदीसाठी १६५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.