व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र MP Amar Kale : भोयर-पवार समाजाचा OBC मध्ये समावेश करा

MP Amar Kale : भोयर-पवार समाजाचा OBC मध्ये समावेश करा

 

Include Bhoyar-Pawar community in OBC : खासदार अमर काळेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Wardha भोयर-पवार समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री यांच्याकडे केली. तसेच या विषयासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट जाती समुहाच्या पहिल्या प्रस्तावात पोवार, भोयर, पवार या जातींची शिफारस आहे. पोवार, भोयर, पवार समाजाला महाराष्ट्र राज्याच्या ओबीसीच्या आरक्षण सुविधाही मिळतात. परंतु केंद्रीय ओबीसी आरक्षण सुविधा मिळत नाही. याविषयी मुंबईतील केंद्रीय ओबीसी आयोग, पुण्यातील महाराष्ट्र ओबीसी आयोग व महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी मंत्रालय यांच्या उपस्थितीत दोनदा सुनावणी झाली.

Hasan Mushrif : वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचे हस्तांतरण लवकरच

त्यानंतर जवळपास १५ जातींना केंद्रीय सूचीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाला प्रस्ताव मान्यता देण्यासाठी पाठविला होता. पण, अद्यापही मंजुरी मिळाली नाही. केंद्र सरकारच्या ओबीसी सूचित पोवार, भोयर-पवार समाजासह प्रस्तावित सूचीतील समाजाला समाविष्ट न केल्यामुळे आरक्षण मिळत नाही.

या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे उच्चशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून तातडीने या समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांच्याकडे केली आहे.

CM Devendra Fadnavis : दंगलीतील आरोपी दंगलीचे ‘सत्य’ कसे शोधणार?

केंद्र सरकारच्या ओबीसी सूचित समाविष्ट करुन घेण्याकरिता सादर केलेल्या शिफारस प्रस्तावात बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेव गुजर, रेव्ह गुजर, रेवा गुजर, पोवार-भोयर-पवार, केपवार, मुन्नार केपवार, मुन्नार कापू, तेलंगणा, तेलंगी, पेंटारेड्डी, रुककरी, लोध-लोधा-लोधी व डंगारी या जातींचा समावेश आहे.

error: Content is protected !!