Kunal Kamra : कुणाल कामराच्या विरोधात शिंदे सेना आक्रमक

Shinde Sena is aggressive against Kunal Kamra : चिखली पोलीस ठाण्यात निवेदन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Buldhana : चिखली शहर शिवसेना शिष्टमंडळाने चिखली पोलीस ठाण्यात निवेदन देत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने आरोप केला की, कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशोभनीय आणि खालच्या पातळीवरील टीका केली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, तालुका प्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रोहित खेडेकर, युवा सेना तालुका प्रमुख गोपीनाथ लहाने, शिवाजी शिराळे, कैलास भालेकर, श्रीकांत टेहरे, राजेश पवार, विनोद वनारे, गजानन पवार, राका मेहेत्रे, पवन चिंचोले, विक्रांत नकवाल, बंडू नेमाने, अमर काळे, शुभम डुकरे, राहुल शेलकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनावर या सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ambadas Danve : औरंगजेबच्या कबरीसाठी साडेसहा लाख, तर शिवरायांच्या मंदिरासाठी २५० रुपये !

शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे की, “एकनाथ शिंदे फक्त आमचे नेतेच नाहीत, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अशा पदावरील व्यक्तींवर अशोभनीय टिप्पण्या करणे म्हणजे सार्वजनिक मर्यादा ओलांडण्यासारखे आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास..
चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “कुणाल कामरावर येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.” पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणावर निदर्शने होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षकांनी या तक्रारीवर कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो..
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामराच्या चित्राला जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया म्हस्के, अंजना खुपराव, कविता गायकवाड, अनिता झंवर, राधा फाटे, लता चव्हाण, कुमोद पाटील, संगिता बढे, रुपाली मिरगे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Ambadas Danve : मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटींग

जोशपूर्ण घोषणाबाजी..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत ‘जोडे मारो’ आंदोलन करून कुणाल कामराच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. शिवसेना महिला आघाडीकडून या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.