Violation of rights against Minister of State for Health Meghna Bordikar : टक्कल प्रकरणी मंत्र्यांची खोटी माहिती, आमदार धीरज लिंगाडे यांनी मांडला प्रस्ताव
Buldhana : शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणावरुन राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी या प्रकरणी विधान परिषदेच्या सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या संशोधनानुसार, सरकारी रेशनमधील गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होऊन टक्कल पडण्याचे निष्कर्ष नोंदवले होते. शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांच्या केसांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. तपासानंतर सरकारी रेशनच्या गव्हातील विषाणू आणि सेलेनियम घटक हे कारण असल्याचे स्पष्ट झाले होते.
मंत्र्यांची खोटी माहिती..
आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला असता, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हामुळे केस गळती होत नसल्याचे उत्तर दिले. यामुळे चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी केला आहे.
Harshawardhan Sapkal : केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले?
हक्कभंग प्रस्ताव दाखल..
धीरज लिंगाडे यांनी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला असून, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव दाखल करून घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणावर राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Mahayuti Government : भावांतर योजनेचेही गाजर, यानंतर लोक महायुतीला संधी देतील का ?
शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील प्रकरण..
शेगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आणि नांदुरा तालुक्यातील एका गावात केस गळतीच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक नागरिकांनी केस गळतीमुळे टक्कल पडल्याची तक्रार केली होती. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या संशोधनानुसार, नागरिकांच्या रक्त, लघवी आणि केसांमध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याचे निष्पन्न झाले.








