Sexual assault on a 10-year-old girl : 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
Gondia गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात एका 22 वर्षीय नराधमाने चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. विकृतीचा कळस गाठणाऱ्या या घटनेने अख्खा गोंदिया जिल्हा हादरला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेतील आरोपी कमलेश मडावी (वय 22) याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी हा पीडित चिमुकलीच्या गावातीलच रहिवासी आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. केशोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी आरोपी तिच्या घरी गेला आणि त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली असता, संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
Prashant Padole : समृद्धी महामार्गासाठी गरज असेल तेवढीच जमीन घ्या!
शेजाऱ्यांच्या कळताच येताच त्यांनी त्वरित पीडितेच्या कुटुंबीयांना याची कल्पना दिली. संतप्त कुटुंबीयांनी लगेच केशोरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 65/2 तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को) 4/6/8 व 332 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. केशोरी पोलीस निरीक्षक गणेश वनारे करत आहेत. आरोपी आणि पीडिता हे एकाच गावातील असल्याने हा गुन्हा अधिक गंभीर स्वरूपाचा मानला जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.








