Breaking

Vanchit Bahujan Aghadi : बोधगयाच्या मुद्यावर वंचित आघाडीही आक्रमक!

Protest at Tehsil office in Lonar : लोणारमध्ये तहसील कार्यालयावर धकडला मोर्चा

Buldhana महाबोधी महाविहार (बोधगया) हे पवित्र स्थळ १९४९ च्या कायद्यामुळे परधर्मीयांच्या ताब्यात आहे. अशी भूमिका घेत देशभरात या मुक्ती आंदोलनाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर लोणार तालुक्यात भाई महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

लोणार बसस्थानक येथून निघालेल्या या मोर्चात हजारो समाजबांधवांनी सहभाग नोंदवून “महाबोधी महाविहार मुक्त करा!” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले. मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोर सभेत झाले.

Ramdas Athavle : महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या

युवा तालुका महासचिव पवन अवसरमोल यांनी मोर्चाचे प्रास्ताविक करत महाबोधी महाविहाराच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. प्रवीण अवसरमोल, राहुल अवसरमोल, रुक्मिणा मोरे, मालती कळंबे, जनाताई अंभोरे, उषा नरवाडे यांनी आंदोलनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

भाई महेंद्र पनाड यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, “जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात दिला जात नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू राहील.” पूज्य भदंत प्रियदर्शी यांनी शील प्रदान केल्यानंतर, तहसीलदार मार्फत बिहार सरकारला निवेदन देण्यात आले.

Gondia Police : फेसबुक आयडी डिलीट कर, नाहीतर ठार मारू!

तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा महासचिव पवन अवसरमोल, युवा तालुकाध्यक्ष गौतम गवई, रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष अशोक जावळे, शिवप्रसाद वाठोरे, सुनील देहाडे, भीम आर्मीचे अमित काकडे, अमितेश अंभोरे, वैभव मस्के, मंगेश सरदार, नारायण नरवाडे, रमेश प्रधान, नितीन नरवाडे, शुभम अवसरमोल, आकाश मोरे, तुषार अंभोरे, दीपक अंभोरे, अशोक सरदार, सुदेश इंगळे, सरस्वतीबाई इंगळे, शोभाबाई प्रधान, पंढरी मस्के, विलास चव्हाण, प्रफुल्ल इंगळे, भीमराव इंगळे आदींसह हजारो बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.