Chandrashekhar Bawankule’s counterattack on Congress spokesperson Atul Londhe : चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेवर पलटवार
Nagpur : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टिका केली. त्यामुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकटे आणि आमदार प्रवीण दटके यांनी लोंढेंच्या विरोधात शहरातील गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोंढेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यची मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
आज (२९ मार्च) नागपुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, अतुल लोंढे यांनी जरा समज ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेण्यापूर्वी त्यांनी विषय समजून घेतला पाहिजे. आम्ही माहिती घेतली असता पडवेकर अशा कुठल्याही नावाचा व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही, आमचे कार्यालय मदत करू शकत नाही. अतुल लोंढे यांनी बालिशपणाची वर्तणूक केली आहे.
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळें यांनी निभावले खऱ्या ‘पालका’चे कर्तव्य !
उदयनराजे भोसले यांनी कोरटकर प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, उदयनराजे भोसले यांचा विचार अगदी योग्य आहे. या देशांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आणि छत्रपती संभाजी राजेंबद्दल अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द काढले जातात.. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याबद्दल आमचे सरकार नक्की विचार करेल आणि मुख्यमंत्री कठोर कायदा करतील, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.