Five arrested for betting on IPL in Wardha District : मुंबई इंडियन्स व कलकत्ता नाइट रायडर लाइव्ह क्रिकेट मॅचवर सुरू होता जुगार
Wardha : अवैधरीत्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या सट्टा जुगारावर पोलिसांनी छापा घातला. यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कारंजा घाडगे येथील इंदिरानगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. त्यांच्या ताब्यातून ९.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिथुनसिंग अवतारसिंग बावरी, (३२), अर्जुनसिंग अजाबसिंग बावरी, (२६) दोन्ही रा. इंदिरानगर, कारंजा घाडगे, राहुल संजय भांगे (२७), रा. जगदंबा कॉलनी, कारंजा (घा), आदित्य नारायण बाजारे, (२४ रा. वाॅर्ड क्र. ८, कारंजा) प्रदीप गजानन बैगणे (२४, रा. कारंजा (घा) यांना ताब्यात घेतले आहे, तर संजयसिंग बावरी, रा. इंदिरानगर, कारंजा (घा), वाजीद पठाण, जलालखेडा, जि. नागपूर, गुड्डू नावाचा व्यक्ती, अशी फरार आरोपींची नावे आहेत.
Wardha Administration : वाळूचे ट्रॅक्टर तर दिसले, मग अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?
जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याचाच फायदा घेत कारंजा येथे लाइव्ह आयपीएल मॅचवर एका बुकीने सट्टा जुगार चालविला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी छापा घातला असता मुंबई इंडियन्स व कलकत्ता नाइट रायडर लाइव्ह क्रिकेट मॅचवर मिथुन बावरी हा त्याच्या इतर साथीदारांसह आयपीएल क्रिकेट जुगार खेळताना मिळून आले.
संजय बावरी हा लघुशंकेला गेलेला असल्याने परस्पर एका मोबाइल संचासह पसार झाला. मुख्य आरोपी मिथुनसिंग बावरी हा आयपीएल प्राप्त सट्टा हा पुढे वाजीद पठाण व गुड्डू नामक व्यक्तीकडे मोबाइलद्वारे पास करीत असल्याची कबुली दिली. यात पाचही जणांना कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांकडून २५ हजार ७१० रुपयांच्या रोख रकमेसह ५५ इंचाचा एलईडी टी.व्ही, एमएच ४६ एक्स ९१५०, महागडे अँड्रॉइड आठ मोबाइल मॅचदरम्यान बेटिंगचे आकडे लिहिलेले २ कागद, सेट टॉप बॉक्स, दोन कॅल्क्युलेटर, असा एकूण ९ लाख ७२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.,
Health Department : गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाईचा फास!
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक राहुल इटेकर, नरेंद्र पाराशर, नितीन इटकरे, सागर भोसले, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, गोविंद मुंडे यांनी केली.








