Breaking

MP Amar Kale : खेड्यांतील घरांनाही द्या अडिच लाखांचे अनुदान!

Provide a subsidy of Rs 2.5 lakhs to houses in villages too : खासदार अमर काळे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

Wardha प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ अंतर्गत घरकुल बांधण्याकरिता शहरी क्षेत्राप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनाही शासनाने प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण Shivrajsingh Chouhan यांना केली.

ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत घरकुलासाठी केवळ १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. दुसरीकडे याच योजनेअंतर्गत शहरी भागात घरकुल बांधण्याकरिता २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. जेव्हा की, घरकुल बांधण्याकरिता लागणारे सर्व बांधकाम साहित्य जसे सिमेंट, रेती, विटा, लोखंड आणि कामगारही शहरी भागात लगेच आणि जवळ उपलब्ध होतात.

Special Public Safety Mission : असे कसे सरकारविरुद्ध बोलता येणार नाही?

मात्र याच योजनेत ग्रामीण भागाशी दुजाभाव करण्यात आला आहे. ग्रामीण भागात घरकुलासाठी केवळ १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात घरकुल बांधण्याकरिता लागणारे सर्व साहित्य शहरातून आणावे लागते. हे बांधकाम साहित्य शहरातून गावात आणण्याकरिता लागणारा वाहतूक खर्च घरकुल लाभार्थ्याला स्वतः परिस्थिती नसताना सहन करावा लागतो.

हा खर्च शहरी भागात लागत नाही, हे वास्तव असताना शहरी भागात घरकुलासाठी अडीच लाख, तर ग्रामीण भागासाठी केवळ १ लाख २० हजार अनुदान दिले जाते. हा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर अन्याय असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Dr. Panaj Bhoyar : आदिवासीबहुल गावांचा होणार कायापालट!

ग्रामीण भागातील घरकुलासाठी वाढीव अनुदानाची मागणी योग्य असून, यासंदर्भात आपण सकारात्मक भूमिका घेऊ. ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाचा खर्च अधिक आहे, हे मान्य आहे, असे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी बोलून दाखविले. तसेच केंद्र सरकार याविषयी गांभीर्याने विचार करून निर्णय घेईल, असे आश्वासन दिल्याचे खासदार अमर काळे यांनी सांगितले.