Ajansara site will be connected to Western Vidarbha : आजनसराला पश्चिम विदर्भाशी जोडणार; वर्धा नदीवर ३८ कोटींचा पूल
Wardha हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्र संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील संत भोजाजी महाराज यांचे समाधीस्थळ ४०० वर्षांपूर्वीचे आहे. दर महिन्याला ५ लाखांवर भाविकांची उपस्थिती असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा नदीवरील पुलाला मंजुरी देऊन लाखो भाविकांची सोय केली आहे.
या ठिकाणी पश्चिम विदर्भातील यवतमाळ, नांदेड व अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. परंतु वर्धा नदीवरील रोहिणी घाटावर पूल नसल्याने भाविकांना फेरा मारून यावे लागते. आता या घाटावरील पुलाच्या बांधकामाकरिता ३८ कोटींचा निधी मंजूर झाल्याने पश्चिम विदर्भातील भाविकांना दिलासा मिळणार आहे.
संत भोजाजी महाराज देवस्थानात दरराेज पुरणपोळीचा स्वयंपाक होत असल्याने भाविकांची गर्दी असते. यवतमाळ, नांदेड व अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना ४० ते ५० किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. त्यामुळे संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय पर्बत, विश्वस्त मंडळ, सरपंच श्रावण काचोळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर यांनी गडकरींना रोहिणी घाटावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती.
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘चांगला डॉक्टर चांगला माणूसही असावा’!
या मागणीला यश आले आहे. गडकरींनी दखल घेत केंद्रीय निधीतून ३८ कोटींचा निधी मंजूर केला. आता लवकरच या पुलाचे बांधकाम सुरू होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. या परिसरात येणाऱ्या आजनसरासह हिवरा, फुकटा, वडनेर, दारोडा, येरणगाव, सिरसगाव, उंदरी, मणसावळी, कान्होली, जागजई, टाकळी (निधा), धानोरा, वनोजा, परसोडा, अंतरगाव या ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव घेऊन या मार्गांवर पूल निर्मितीबाबत सतत मागणी सुरू होती.
Nitin Gadkari : सहकारी बँकांना शक्ती मिळणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे
गडकरींनी दखल घेऊन विदर्भातील कळंबचे चिंतामणी, माहूरगडाची रेणुकामाता या तीर्थक्षेत्राला अगदी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय निधीतून ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पत्र अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांना प्राप्त झाले आहे. लवकरच या पुलाचे काम सुरू होणार आहे.