व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sulbha & Sanjay Khodke : आमदार दाम्पत्य लागले कामाला, एकत्र घेतली बैठक

Sulbha & Sanjay Khodke : आमदार दाम्पत्य लागले कामाला, एकत्र घेतली बैठक

 

MLA conducted review meeting of town planning department : नगररचना विभागाचा आढावा; नियोजन, परवानगीवर भर

Amravati आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत, तसेच महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगररचना विभागाचा आढावा बैठकीत घेतला गेला. ही बैठक शुक्रवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.

प्रारंभी आयुक्त कलंत्रे यांनी आमदारद्वयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विधान परिषदेवर नव्यानेच निवडून आलेले आमदार संजय खोडके यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुभाष घोडके यांच्यासाठी चांगलाच उपयुक्त ठरत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. या आढावा बैठकीत शहरातील विविध नगरविकास विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

MLC Sanjay Khodke : विदर्भाच्या विकासासाठी श्वेतपत्रिका तयार करणार

 

त्यामध्ये रिकाम्या भूखंडांचे नियोजन, डीपी रोड, शासकीय व खासगी जागांवरील आरक्षण, मालमत्ता कर, ले-आऊट मंजुरी, नाली व रस्त्यांचे बांधकाम, तसेच बांधकाम परवानग्यांचा समावेश होता. नवीन ले-आऊट मंजुरीच्या प्रक्रियेत, प्रत्यक्ष पाहणी करूनच मंजुरी द्यावी, असे निर्देश आमदारांनी दिले. विशेषतः नालीचे काम सुरू असताना नैसर्गिक पाणी प्रवाह अडथळ्याविना होईल, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले.

MP Anup Dhotre : अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार

 

कामांची गती वाढवून ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही आमदारद्वयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित विभागांनी कामांची अंमलबजावणी तात्काळ करून नागरी सुविधा उन्नत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना आमदार सुलभा खोडके यांनी केली. नगररचना विषयक नियमबाह्य भूखंड विक्री, ग्रीन झोन आदी विषयांचीही माहिती यावेळी घेतली गेली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, तसेच नगररचना सहायक संचालक घनश्याम वाघाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!