Chandrashekhar Bawankule’s announcement regarding the deaths and injuries in the accident at Umred MIDC : जखमी कामगारांना ३० लाख रुपये व मोफत उपचार
Nagpur : उमेरड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास 30 लाख रुपयांची मदत केली जात आहे. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार केले जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वित्त राज्यमंत्री यांनी आज (१२ एप्रिल) घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपरोक्त घोषणा करण्यात आली. ही संपूर्ण घटना कशी घडली, याची संपूर्ण माहिती प्रशासन आणि कंपनी मालक यांच्याकडून जाणून घेतली. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आणि जे जखमी आहेत, त्यांना आणखी काही मदत करता येईल यावर चर्चा केल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.
Bacchu Kadu attacks on Ravi Rana : “सत्तेची पावर होती तेव्हाच जाग आली असती तर…”
कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये, यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख, तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. सोबतच मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे. जखमींना ज्या ज्या ठिकाणी न्यावे लागेल त्या ठिकाणी एअर ॲम्बुलन्सने आम्ही घेऊन असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
Sandip Joshi : शहरातील पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घ्या !
अपघातात मृतांमध्ये पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर यांचा समावेश आहे.
जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर यांचा समावेश आहे.